बीडKundlik Khande office vandalized :बीड शहरातील जालना रोडवरील शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयावर गुरुवारी (२७ जून) दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयाचं मोठं नुकसान झालं आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी दगडफेक केल्याचं बोललं जात आहे. बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.
शितलकुमार बल्लाळ यांची प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter) कथित ऑडिओ क्लिप व्हायरल :बीड लोकसभा निवडणुकीदरम्यानची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ऑडिओ क्लिप शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या आवाजात आहे. राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार बजरंग सोनवणे यांच्याशी कुंडलिक खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप समोर आल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. त्यानंतर लगेचच कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयाची अज्ञात हल्लेखोरांनी तोडफोड केली. आता या घटनेमुळं बीड शहरातील वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
आम्ही बाप्पाचं काम केलं :कुंडलिक खांडे यांच्या आवाजाची कथित ऑडिओ क्लिप गुरुवारी सकाळी व्हायरल झाली. त्यानंतर अज्ञात नागरिकांनी जालना रोडवरील कार्यालयाची तोडफोड केली. व्हायरल झालेली ऑडिओ क्लिपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तसंच कुंडलिक खांडे यांचा आवाज असल्याचा दावा केला जात आहे. 'आम्ही आमच्या गावातच पंकजा मुंडेंना आघाडी दिली. विधानसभेत ओबीसी मते मिळवण्यासाठी मला याची गरज होती, पण आम्ही बाप्पाचं काम केलं. त्यांना सर्व यंत्रणा देण्यात आली आणि पैसेही देण्यात आले. विशेष म्हणजे संबंधित कार्यकर्त्यांनी विश्वासघात केल्याचं मान्य केल्याचं दिसत आहे. दुसऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांच्यात दोषारोप होत असल्याचं समजतं. शरद पवारांचा फोटो आमच्या कार्यालयात लावू, मी इथे जनता दरबार भरवतो, मी थेट अंगावर जाऊ शकतो'. एवढंच नाही तर, या ऑडिओ क्लिपमध्ये महायुतीतील मंत्री, राष्टट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची गाडी फोडण्याचा कट रचत असल्याचं कथित क्लिपमध्ये दिसतंय. या क्लिपमध्ये धनंजय मुंडे यांच्या गाडीवर दगडफेक केल्यास त्यांची मते वाढतील, अशी टिप्पणीही करण्यात आली आहे. ही ऑडिओ क्लिप लोकसभा निवडणुकीपूर्वीची असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही पुरावे : शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचं कार्यालय अज्ञातांनी फोडलं आहे. याबाबत पोलिसांकडं सीसीटीव्ही पुरावे आहेत. तसंच काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत, त्यांच्या माध्यमातून पोलीस लवकरच हल्लेखोरांपर्यंत पोहोचतील. या तोडफोडीत जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी दिली.
'हे' वाचलंत का :
- व्होटबँक म्हणून वापर करण्याऐवजी काँग्रेसनं अमरावतीत मुस्लिम उमेदवार द्यावा; भाजपाची मागणी - Amravati Assembly Constituency
- तर अशा मनुस्मृतीचे धडे आपण विद्यार्थ्यांना देणार का? जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले - Awhad On Manusmriti
- आधी शेतकरी कर्जमाफी करा नंतरच निवडणुकीला सामोरं जा, उद्धव ठाकरेंचं महायुती सरकारला आव्हान - Uddhav Thackeray PC