महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संतोष देशमुख हत्याकांड; 3 आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी - SANTOSH DESHMUKH MURDER CASE

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तिघांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Sarpanch Santosh Deshmukh case
संतोष देशमुख हत्याकांड आरोपी (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2025, 8:49 PM IST

बीड :सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना कोर्टानं 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरपंच देशमुख यांची हत्या करून सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) आणि सुधीर सांगळे (Sudhir Sangle) हे आरोपी फरार झाले होते. तर आरोपींना संतोष देशमुख यांच्याविषयी माहिती देणारा सिद्धार्थ सोनवणे हा (Siddharth Sonawane) देखील फरार होता. या तीनही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली. आरोपींना आज जिल्हा कोर्टात हजर केल्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद झाला आणि त्यानंतर कोर्टाने तीनही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

14 दिवसांची पोलीस कोठडी : सिद्धार्थ सोनवणे हा संतोष देशमुख यांच्या खुनातील आरोपींना लोकेशन देत असल्याची माहिती आहे. तर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे या खून खटल्यातील मुख्य आरोपी असून त्यांना न्यायालयाने 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या अगोदर पुणे येथील पाषाण पोलीस ठाण्यात स्वतः सरेंडर झालेला आरोपी वाल्मीक कराडला बीड शहर पोलीस ठाण्यात जेरबंद करण्यात आलं आहे. त्याचबरोबर त्याची सीआयडी चौकशी चालू आहे. वाल्मीक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सीआयडी तपास करत आहे. त्यामुळं या सर्व प्रक्रियेत वाल्मीक कराड कितपत सामील आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रतिक्रिया देताना वकील अनंत तिडके (ETV Bharat Reporter)




केज न्यायालयात झाला युक्तिवाद : युक्तिवाद करताना वकील म्हणाले, आरोपीने जो गुन्हा केला आहे त्याची शिक्षा त्यांना मिळणार आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे मकोका लावावा तर संघटित गुन्हेगारी निष्पन्न होईल. विष्णू चाटेला गेल्या 20 दिवसापासून अटक करण्यात आलेली आहे. आवादा कंपनीला मागितलेल्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये विष्णू चाटेचं नाव आहे. त्याच्यावर किडनॅपिंगचा देखील गुन्हा आहे. याप्रकरणी तपास यंत्रणा किती गांभीर्यानं हे प्रकरण हाताळत आहे हे आपण पाहत आहोत. या प्रकरणांमध्ये या सर्व आरोपींचा कुणीतरी लीडर असला पाहिजे, न्यायाधीशांनी युक्तिवाद करताना सिंडिकेट हा शब्द वापरला आहे, जो शब्द मकोकामध्ये वापरला जातो. असा एकूणच युक्तिवाद झाला असून यामध्ये न्यायाधीशांनी 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी परभणीत मूक मोर्चा :संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ परभणीत आज सर्वपक्षीय नेत्यांकडून मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मूक मोर्चात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता. या मोर्चात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी "पकडण्यात आलेल्या आरोपींची नार्को टेस्ट करावी. या आरोपींना ज्यांनी लपवलं, त्यांच्यावर हत्येत सहभागी असल्याचा गुन्हा दाखल करावा," अशी मागणी केली. तर मूक मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे, ज्योती मेटे आदींसह देशमुख कुटुंबीय सहभागी झाले होते. यासंदर्भात खा. सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणातील आरोपी पुण्यातच का सापडतात अशी विचारणा केली आहे. तसंच या प्रकरणाची दिल्लीपर्यंत चर्चा असल्याचं त्या पुण्यात म्हणाल्या.

हेही वाचा -

  1. संतोष देशमुख हत्याकांड; परभणीत हजारो नागरिकांचा मोर्चात सहभाग, मनोज जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल
  2. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीची स्थापना, एसआयटीत सर्व अधिकारी बीडचे!
  3. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करा-मस्साजोगच्या ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details