मुंबई Felicitated by Chief Minister - अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे पार पडलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळाल्यानंतर सर्व देशवासीयांनी भारतीय संघाचं तोंड भरून कौतुक करत जल्लोष साजरा केला होता. मायदेशी परतल्यानंतर भारतीय संघानं शुक्रवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सत्कार स्वीकारून मुंबईत भारतीय संघाचा विश्वचषकासह रोड शो पार पडला. त्यानंतर वानखेडे मैदानावर भव्य कार्यक्रम झाला. संघाला सव्वाश कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. तर आज विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातील मुंबईतील चार खेळाडूंचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी सत्कार केला.
तब्बल 13 वर्षानंतर भारतीय क्रिकेट संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. वेस्टइंडीज आणि अमेरिका येथे नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात भारताने जोरदार कामगिरी करत विश्वचषकावर आपलं नाव कोरल. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामन्यात भारताने रोमहर्षक विजय मिळवला. बीसीसीच्या वतीने देशभरातून भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांकडून भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक करून ठिकठिकाणी जल्लोष देखील साजरा करण्यात आला होता. टी ट्वेंटी विश्वचषकासह भारतीय संघ गुरुवारी मायदेशी परतला, त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही सत्कार स्वीकारला. तर संध्यकाळी बीसीसीआयच्या वतीने भव्य दिव्य कार्यक्रम मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला.