महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजेंद्र देवमन वाघ यांना राष्ट्रपती पोलीस पदक, पाप्या शेखसारख्या गुंडांच्या टोळ्यांसह उल्लेखनीय कामांची उत्तुंग पावती - RAJENDRA DEVMAN WAGH

अहिल्यानगरचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र देवमन वाघ यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणावर गुन्हे उघडकीस आणून उत्कृष्ट सेवा दिली आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 25, 2025, 5:35 PM IST

अहिल्यानगर -अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक पदी काम करणारे राजेंद्र देवमन वाघ यांना दिनांक 26 जानेवारी, 2025 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालं आहे. त्यांच्यावर यानंतर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामगिरीचा यानिमित्तानं गौरव होत आहे.

राजेंद्र देवमन वाघ यांची विशेष उल्लेखनीय कामगिरी

  • अहिल्यानगर जिल्ह्यातील आण्णा लष्करे, पाप्या शेख अशा सराईत गुंडांच्या टोळ्या पकडणे
  • परराज्यातील गावठी पिस्तुल (कट्टे) तयार करणारे 188 गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून 101 देशी बनावटीचे पिस्तुल (कट्टे) व 263 जिवंत काडतुसे जप्त केली
  • अहिल्यानगर जिल्ह्यात गाजलेले पेट्रोल पंपावरील दरोडे, तसंच इतर 154 दरोडेखोरांना अटक करुन 74,81,000/- रुपये किंमतीचा चोरीस गेलेला माल जप्त केला
  • रात्री व दिवसा अशा 36 घरफोडी गुन्ह्यातील 156 गुन्हेगारांना अटक करुन दीड कोटी रुपये किंमतीचा चोरीस गेलेला माल जप्त केला
  • अहिल्यानगर जिल्ह्यातील 74 अट्टल फरार गुन्हेगारांना अटक
  • अहिल्यानगर जिल्ह्यात बनावट चलनी नोटा चलनात आणणाऱ्या 2 आरोपींना 60000 रुपये किंमतीच्या बनावट चलनी नोटांसह ताब्यात घेतले
  • खडकवाडी, ता. पाथर्डी येथे 11 वर्षापूर्वी घडलेल्या खुनाच्या गुन्ह्याची उकल करुन आरोपीला अटक
  • अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोटार सायकल चोरी करणाऱ्या 20 सराईत गुन्हेगारांचा शोध, 120 चोरीच्या मोटार सायकल हस्तगत
  • शाळकरी मुलींवर बलात्कार करुन खून करणारा नेवासा येथील नराधम आरोपी अनिल पवार यास अटक करुन दुहेरी फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहचवले
  • बहुचर्चीत कांडेकर खून खटल्यातील 3 शार्प शूटरचा गोवा राज्य व पुणे जिल्हा येथून अटक, आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
  • अहिल्यानगर शहरात 2004 साली शिवजयंती साजरी मिरवणूक मार्गावर घातपात तयारीतील 15 आरोपींच्या कब्जातून शस्त्रे जप्त करुन मोठी घातपाताची घटना टाळली
  • शिर्डी येथील 2 मुलांचे अपहरण करुन खून करणारा आरोपी पाप्या सलीम ख्वाजा शेख आणि त्याच्या इतर 11 साथीदारांची, सर्वांना जन्मठेप
  • भरोसा सेलमध्ये असताना 125 कौटुंबिक प्रकरणांमध्ये समुपदेशकाची महत्वपूर्ण भूमिका, संसार पुन्हा उभारण्यात मोलाचा वाटा
  • अहिल्यानगर शहरातील शाळा कॉलेज परिसरात 1148 मुलींची छेडछाड करणाऱ्या तरुण टोळक्यांचे समुपदेशन
  • पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी राजेंद्र वाघ यांना 370 बक्षिसे व 1,64,800/- रुपये रोख रक्कम व 29 प्रशंसापत्रे तसेच सलगपणे 16 वर्षे A+ शेरा दिलेला आहे
  • सन 2016 मध्ये पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी पोलीस महासंचालक पदक देवून सन्मानित केले

राजेंद्र वाघ यांचा मोठ्या प्रमाणात असलेला जनसंपर्क आणि त्यांची अतिशय प्रामाणिक, निष्ठावान तसंच उत्कृष्ट पोलीस अधिकारी अशा प्रतिमेमुळे पोलीस दलाची प्रतिमा सामान्य जनतेमध्ये सुधारण्यास मदत झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details