महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Railway Station Rename : मुंबईतील रेल्वे स्थानकांना मिळणार नवी ओळख; ब्रिटिशकालीन स्थानकांचं होणार नामांतर - Mumbai Railway Station Name Change

Rahul Shewale : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील काही स्टेशन्सची नावं लवकरच बदलण्याची शक्यता असून यासंदर्भात खासदार राहुल शेवाळेंची संबंधित विभागांशी आज (12 मार्च) बैठक झाली. तसंच उद्या होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये यावर निर्णय होणार आहे.

Rahul Shewale Demanded the State Government to change name of British era railway stations in Mumbai
मुंबईतील रेल्वे स्थानकांना मिळणार नवी ओळख; ब्रिटिशकालीन 8 रेल्वे स्थानकांचं होणार नामांतर

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 12, 2024, 8:06 PM IST

मुंबई Rahul Shewale : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेला आता लवकरच नवी ओळख मिळणार आहे. मुंबईतील ब्रिटिशकालीन 8 रेल्वे स्थानकांची नावं बदलून नवी नावं देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं केली आहे. या मागणीला राज्य सरकारनं तत्वतः मंजुरी दिली असून कॅबिनेट निर्णयानंतर राज्य सरकारच्या वतीनं हा प्रस्ताव केंद्र सरकारकडं पाठवला जाणार आहे.

राहुल शेवाळे यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय की, मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकं आजही ब्रिटिशकालीन नावानं ओळखली जातात. मात्र, या रेल्वे स्थानकांच्या परिसरातील इतिहास पाहता, या स्थानकांच्या नामांतराची मुंबईकरांची मागणी आहे. त्यामुळं करी रोड रेल्वे स्थानकाला लालबाग तर मरीन लाईन्स स्थानकाला मुंबादेवी यांसह एकूण सात रेल्वे स्थानकांचं नामांतर करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. तर राज्य सरकारच्या वतीनं यापूर्वीच मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नामांतर नाना जगन्नाथ शंकरशेठ रेल्वे स्थानक करण्यात यावं यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला आला. त्यामुळं आता मुंबईतील एकूण 8 रेल्वे स्थानकांची नावं बदलणार आहेत.

भारतीय पारतंत्र्याची ओळख पुसण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळं मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावं बदलण्याची जनतेची मागणी होती. ही जनतेची भावना राज्य सरकारपर्यंत पोहोचवली. या मागणीला तत्त्वत: मंजुरी दिल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आभार मानतो. लवकरच याविषयी मंत्रिमंडळ निर्णय करून हा प्रस्ताव केंद्र सरकारकडं पाठवला जाईल- खासदार राहुल शेवाळे

नामांतरासाठी प्रस्तावित रेल्वे स्थानकं :

1. करी रोड - लालबाग

2. सँडहर्स्ट रोड - डोंगरी

3. मरीन लाईन्स - मुंबादेवी

4. चर्नी रोड - गिरगाव

5. कॉटन ग्रीन -काळाचौकी

6. डॉकयार्ड - माझगाव

7. किंग्ज सर्कल - तीर्थंकर पार्श्वनाथ

8. मुंबई सेंट्रल - नाना जगन्नाथ शंकरशेट

हेही वाचा -

  1. ठाण्याजवळ नवीन रेल्वे स्थानक होणार, कामाला मिळणार गती; वाचा कधीपर्यंत होणार प्रवाशांसाठी खुलं?
  2. होळीच्या सणाला रेल्वेची खास सेवा: मध्य रेल्वे चालवणार 112 विशेष ट्रेन
  3. अंबरनाथमध्ये झोपडपट्टीला भीषण आग; ९ गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे अनेक झोपड्या जळून खाक

ABOUT THE AUTHOR

...view details