महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शनिवारवाडा परिसरात बेवारस बॅग; बॉम्ब पथकाकडून तपास सुरू - Pune News - PUNE NEWS

Pune News : पुणे शहरातून मोठी बातमी समोर आलीय. दररोज हजारोंच्या संख्येनं पर्यटकांची गर्दी असलेल्या शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळल्याचा फोन पोलिसांच्या कंट्रोल रुमला आलाय. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून परिसरात असलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलय.

Pune News
Pune News (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 1, 2024, 1:06 PM IST

पुणे PuneNews : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आणि दररोज हजारोंच्या संख्येनं पर्यटकांची गर्दी असलेल्या शनिवारवाडा परिसरात बेवारस बॅग आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. शनिवारवाड्यात बेवारस बॅग असल्याचा एक फोन पुणे पोलिसांच्या कंट्रोल रुमला आला. पोलिसांनी तत्काळ तिथे धाव घेत शनिवारवाडा काही क्षणात रिकामा केला. बॉम्बशोधक पथकही शनिवार वाड्यात दाखल झालं असून शोधमोहीम सुरू आहे.

बेवारस बॅगची अफवा :याबाबत पोलीस अधिकारी साईनाथ ठोंबरे म्हणाले की, शनिवार वाड्याच्या परिसरात बेवारस बॅग आढळल्याचा फोन पोलिसांच्या कंट्रोल रुमला आला. घटनास्थळी दाखल होऊन शनिवारवाडा परिसरात असलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं. तसंच बीडीडीएस टीम देखील बोलावली असून त्यांच्या माध्यमातून चौकशी केली जात आहे. परंतु कोणतीही बेवारस बॅग शनिवार वाडा परिसरातून आढळून आलेली नाही. ज्या व्यक्तीनं फोन केला त्याचा तपास सुरू आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलय.

हेही वाचा

ABOUT THE AUTHOR

...view details