पुणे :नाकाबंदीत पुणे ग्रामीण पोलिसांनी एका कारमधून तब्बल 5 कोटी रुपयाची रोख जप्त केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना खेड शिवापूर टोल नाक्यावर उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला बोलताना दिली. मात्र उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. संजय राऊत यांनी सोशल माध्यमांवर पोस्ट शेयर करत " काय बापू, काय झाडी काय डोंगर" असा निशाना साधत "मिंधे यांनी प्रत्येक आमदाराला 75 कोटी रुपये पाठवले असून 15 कोटीचा हा पहिला हप्ता" असं नमूद केलं आहे. त्यामुळे मोठं राजकारण तापण्याची शक्यता आहे.
खेड शिवापूर टोल नाक्यावर 5 कोटींची रोकड पकडली :आगामी विधानसभा निवडणूक 2024 ची आदर्श आचारसंहिता राज्यात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. पुणे ग्रमीण पोलिसांनी मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर बंदोबस्त लावला आहे. सोमवारी रात्री बंदोबस्तात तपासणी करताना साताऱ्याकडं जाणाऱ्या एका कारमध्ये चार जण बसलेले होते. या कारची पोलिसांनी तपासणी केली असता, त्यात तब्बल 5 कोटीची बेहिशोबी रोकड आढळून आली. यावेळी पोलिसांनी ही रोकड ताब्यात घेत त्या चार जणांची चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
पोलीस आणि निवडणूक अधिकारी करत आहेत पैशांची मोजणी :साताऱ्याकडं जाणाऱ्या कारमधील चार जणांकडून पोलिसांनी तब्बल 5 कोटी रुपयाची बेहिशोबी रोख ताब्यात घेतली आहे. या कारवाईनंतर पोलीस आणि जिल्हा निवडणूक अधिकारी या पैशांची मोजणी करत आहेत. या चार जणांकडं रोख रक्कम कुठून आली ? या रोख रकमेचा स्त्रोत काय ?, आदी बाबीचां तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.
संजय राऊत म्हणाले 'काय झाडी काय डोंगर' :कारमध्ये 5 कोटी रुपयाची रक्कम आढळून आल्यानंतर उबाठा गटाचे नेते कासदार संजय राऊत यांनी सोशल माध्यमात एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता, त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. या पोस्टमध्ये संजय राऊत यांनी,
"मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर १५ कोटी सापडले!
हे आमदार कोण?