महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नदीवर फूलं टाकण्यासाठी गेली अन् पडली; पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळं महिलेला मिळालं जीवनदान - Woman Drowned Ulhas River

Woman Drowned Ulhas River : नदीवर फूलं टाकण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेला पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळं जीवनदान मिळालं आहे. पोलीसांनी नदीत उडी मारून दाखवलेल्या प्रसंगावधानामुळं त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 7, 2024, 9:28 PM IST

Machhidra Chavan
पोलीस मच्छिद्र चव्हाण (ETV Bharat Reporter)

ठाणे Woman Drowned Ulhas River: कल्याणमध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळं एका वृद्ध महिलेला जीवदान मिळालं आहे. कल्याण पश्चिमेतील गांधारी पुलाखालून वाहणाऱ्या उल्हास नदीवर एक वृद्ध महिला फुलं टाकण्यासाठी आली होती. मात्र, काही वेळानं त्या ठिकाणी महिला दिसत नसल्याचं एका नागरिकानं पाहिल्यानंतर त्यांनी गांधारी पुलावर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला याची माहिती दिली. हे ऐकून पोलीस कर्मचाऱ्यानं त्याच्या ट्रॅफिक वॉर्डनसह नदीत उडी मारत महिलेचे प्राण वाचवले आहेत. ही घटना कल्याण-पडघा मार्गावरील गांधारी पुलानजीक घडली आहे. मच्छिद्र चव्हाण असं वाहतूक पोलीस कर्मचारी तसंच संजय जयस्वाल असं देवदतु ठरलेल्या ट्रॅफिक वार्डनचं नाव आहे. तर, सुनंदा बोरसे (वय 72) असं प्राण वाचलेल्या वृद्ध महिलेचं नाव आहे.

महिला बुडाली पाण्यात : पोलीस हवालदार मच्छिद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयस्वाल गेल्या 6 महिण्यापासून कल्याण वाहतूक शाखेच्या हद्दीत असलेल्या गांधारी पुलानजीक वाहतूक सुरळीत करण्याचं काम करतो. त्यातच कल्याण पश्चिम भागातील गांधारी येथील रोनक सोसायटीमध्ये सुनंदा बोरसे आपल्या कुटुंबासह राहतात. सुनंदा बोरसे फुलं टाकण्यासाठी आज 7 जुलै (रविवार) 11 : 30 च्या सुमारास नदीजवळ आल्या होत्या. दुसरीकडं दोन दिवसापासून कोसळणाऱ्या पावसामुळं नदीची पातळी वाढली होती. सुनंदा फुल टाकण्यासाठी खाली उतरल्या. तेव्हा एका प्रत्यक्षदर्शी नागरिकानं नदी किनारी गेलेली महिला दिसत नसल्याची माहीती कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस हवालदार मच्छिंद्र चव्हाण यांना दिली.

पोलिसांनी वाचवले प्राण : माहिती मिळताच वाहतूक पोलीस मच्छिंद्र चव्हाण यांनी वार्डन संजय जयस्वाल यांच्यासह थेट नदी किनारा गाठला. पावसामुळं नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. काही अंतरावर त्यांना महिलेची साडी तरंगताना दिसली. संशय आल्यानं मच्छिंद्र चव्हाणसह त्यांचा वॉर्डन जयस्वाल दोघे नदी पात्रातील प्रवाहात उतरले. त्यांनी साडी पकडली असता वृद्ध महिलेचा हात त्यांच्या हाताला लागताच दोघानी तिला पाण्याबाहेर आणलं. त्यानंतर महिलेला तातडीनं जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं. त्यावर महिलेच्या कुटुंबानं प्रतिक्रिया दिली आहे. दोघेही देवदूत सारखे धावून आल्यामुळं आमच्या आजीचे प्राण वाचले असं महिलेच्या नातेवाईकांनी सांगितलंय.


हे वाचलंत का :

  1. शहापूर तालुक्यात पुराचं थैमान, पुरामध्ये अडकलेल्या दिडशेहून अधिक पर्यटकांना एनडीआरएफच्या पथकानं वाचवलं; शेकडो घरं पाण्याखाली - Heavy Rain in Thane
  2. पंचगंगा नदी इशारा पातळी गाठायला 'इतके' फूट बाकी; तब्बल 38 बंधारे पाण्याखाली - Panchganga River
  3. शहापूर आणि मुरबाड तालुक्यात मुसळधार पाऊस; वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली, 18 गावपाड्यांचा संपर्क तुटला - Heavy rain in Thane district

ABOUT THE AUTHOR

...view details