मुंबई North Mumbai Lok Sabha :मुंबईतील लोकसभेच्या सहा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांमध्ये भाजपाचं वर्चस्व होतं. या तिन्ही मतदारसंघाचे विद्यमान उमेदवार भाजपानं बदलले होते. उत्तर मुंबई हा भाजपाचा सर्वात सुरक्षित मतदारसंघ या मतदारसंघातून मागील दोन टर्म गोपाळ शेट्टी हे भाजपचे खासदार निवडून येत होते. परंतु यंदा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना या मतदारसंघात उतरवण्यात आलं. पीयूष गोयल यांनी 6,80,146 मत घेत काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांचा 3.57,608 मतांनी पराभव केलाय. परंतु आतापर्यंत गोपाळ शेट्टी यांनी मागील दोन टर्ममध्ये मतदारसंघात सर्वात जास्त लीड घेतलं होतं. त्यात एक लाखापेक्षा जास्त मतांनी हे मताधिक्य कमी झालंय.
सुरुवातीपासून घेतलेला लीड शेवटपर्यंत कायम :मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झालाय. मुंबई उत्तर हा मतदारसंघ भाजपसाठी मुंबईतच नाही तर राज्यातील सर्वात सुरक्षित असा मतदार संघ मानला जातो. या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी बोरिवली - सुनील राणे, दहिसर - मनीषा चौधरी, कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर, चारकोप - योगेश सागर हे भाजपचे आमदार असून मगाठणे या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे हे आमदार आहेत. तर मालाड पश्चिम या मतदारसंघात काँग्रेसचे अस्लम शेख हे आमदार आहेत. अशाप्रकारे सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघावर महायुतीचं वर्चस्व असल्याकारणानं हा मतदारसंघ भाजपसाठी अतिशय सुरक्षित मानला जातो.
यंदाच्या निवडणुकीत भाजपनं विद्यमान खासदार गोपाल शेट्टी यांचा पत्ता कट करून या जागेवर पीयूष गोयल यांना उतरवलं होतं. मागील दोन टर्म पासून भाजपचे गोपाल शेट्टी या भागातून मोठ्या मताधिक्यानं निवडून आले आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानात 1 ते 5 टक्क्यांनी घट झाली होती. येथे 57.02 टक्के मतदान झाल. एकतर्फी झालेली ही लढत रंगतदार होईल, अशी अपेक्षा होती. परंतु या मतदारसंघात भाजपचे उमेदवार पीयूष गोयल यांनी सुरुवातीपासूनचे लीड शेवटपर्यंत कायम ठेवलं.