महाराष्ट्र

maharashtra

प्रेयसीकडून प्रियकराचा गेम; दोन लाखांची सुपारी देऊन केली हत्या, 5 आरोपींना अटक - Girlfriend killed boyfriend

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 21, 2024, 11:03 PM IST

Girlfriend killed boyfriend : नाशिकमध्ये पंचवटी परिसरात निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाची प्रेयसीनंच निर्घृण हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. प्रेयसीनं दोन लाखांची सुपारी देत हे हत्याकांड घडवून आणलंय. या प्रकणात आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Girlfriend killed boyfriend
नाशिक हत्येप्रकरणी पाच आरोपींना अटक (ETV BHARAT Reporter)

नाशिक Girlfriend killed boyfriend :पंचवटीतील मेरी परिसरात निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा गगन प्रवीण कोकाटे याचा मृतदेह आढळून आला होता. प्राथमिक तपासात मृतदेहाच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरून ही घटना प्रेमप्रकरणातून झाल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवताच प्रेयसीनंच गगणची हत्या केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी प्रेयसीसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. प्रेयसीनं दोन लाख रुपये देऊन प्रियकर गगन कोकाटेची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

मधुकर कड माहिती देताना (ETV BHARAT Reporter)



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गगनची हत्या करण्यासाठी एका प्रेयसीनं संशयितांना दोन लाख रुपये दिले होते. गगन आणि तिच्यामध्ये प्रेमसंबध होते. मात्र, गगन तिला सतत त्रास देत होता. त्यामुळं प्रेयसीनं संकेत शशिकांत रणदिवेसह तिच्या साथीदारांना दोन लाखांची सुपारी देऊन गगनची हत्या केली. खुनाचा गुन्हा घडल्यापासून पोलिसांनी अवघ्या पाच तासांत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत.

2 लाखांची सुपारी देऊन हत्या : गगन कोकाटेची हत्या करणारे आरोपी हे सातपूर, अशोकनगर भागातील आहेत. त्यात संकेत शशिकांत रणदिवे, मेहफुज रशीद सय्यद, रितेश सपकाळे, गौतम दुसाने यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. शिक्षिका असलेल्या प्रेयसीचे गगनसोबत प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून गगन तिला त्रास देत होता. यातून तिनं 2 लाखांची सुपारी देत गगनचा खून केल्याची कबुली दिली. या प्रकणाचा छडा पंचवटी पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकानं लावल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितलं.

रक्ताच्या थारोळ्यात गगन -नाशिकच्या पंचवटी परिसरातील मेरी कंपाऊंड भागात मराठा समाजाच्या वसतीगृहाबाहेर गगन कोकाटे (वय 28) रा. वृंदावन नगर, म्हसरूळ, नाशिक या युवकाची मंगळवार 20 तारखेला मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात संशयितांनी डोक्यात तीक्ष्ण हत्यारानं वार करून हत्या केली. ही घटना सकाळी काही लोकांच्या निदर्शनास आल्यानं उघडकीस आली आहे. याबाबत सकाळी सात वाजण्याच्या सुमारास काही नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात गगन याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्याची माहिती पंचवटी पोलिसांना दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक ज्योती आमने यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

हे वाचलंत का :

  1. निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाची निर्घृण हत्या - Brutal murder

ABOUT THE AUTHOR

...view details