पुणे MBBS Admission Guidance :भारतात एमएमबीबीएससाठी असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या फीमुळे अनेक विद्यार्थ्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगते. अशा विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. जॉर्जियामध्ये अत्यंत माफक फीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊन एमबीबीएस होण्याचं स्वप्न साकारण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी येत्या रविवारी सेमिनारचं आयोजन करण्यात आलं आहे. जतन फाऊंडेशन, फिनकॉम एज्यु व्हेनचर्स, पॅट्रिक एज्युकेअर यांच्यावतीनं या सेमिनारचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, जतन फाऊंडेशनचे रवींद्र झेंडे यांनी दिली आहे.
पुण्यातील नवी पेठमध्ये होणार सेमिनार :जर्मनीतील जॉर्जियामधील कॉकेशस युनिव्हर्सिटी, ईस्ट वेस्ट युनिव्हर्सिटी आणि बैल्स सी या युनिव्हर्सिटीमध्ये उपलब्ध असणाऱ्या एमबीबीएसच्या संधी बाबत सर्व माहिती या सेमिनारमध्ये देण्यात येणार आहे. या युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएसच्या अभ्यासक्रम चार वर्षाचा असून दोन वर्ष इंटर्नशीप असा एकूण सहा वर्षांचा हा कोर्स आहे. एकूण सहा वर्षाचा हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सगळा खर्च माफक असून यामध्ये हॉस्टेल, भारतीय जेवण यांचा समावेश आहे. त्याचबरोबर हा अभ्यासक्रम पूर्ण करत असतानाच जर्मन भाषेचं प्रशिक्षणही देण्यात येते. इथं एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या एफएमजी या परिक्षेची तयारीही करून घेतली जाते.