महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आगीत फूड प्रॉडक्ट कंपनी जळून खाक; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या आग विझवण्याचे अटोकाट प्रयत्न - Thane massive fire

Thane massive fire : ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील वेंकटरमना फूड प्रॉडक्ट या खाद्यपदार्थाच्या कंपनीमध्ये बुधवारी दुपारी 4 च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आग नेमकी कशामुळं लागली याचं कारण अस्पष्ट आहे.

Thane Food Company Fire
फूड प्रॉडक्ट कंपनीला आग (Source - ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 2, 2024, 10:14 PM IST

ठाणेThane massive fire:ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील वेंकटरमना फूड प्रॉडक्ट या खाद्यपदार्थाच्या कंपनीमध्ये बुधवारी दुपारी 4 च्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली. आग आटोक्यात आणण्यासाठी ठाणे अग्निशमन दलासह मीरारोड, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण महापालिका अग्निशमन दल, ठामपा टीडीआरएफ जवान आणि ठाणे महापालिकेचं आपत्कालीन पथक शर्थीचे पथक प्रयत्न करत आहेत.

अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल : आगीच्या घटनेची माहिती मिळताच बघ्यांची गर्दी जमली. आगीनं काही वेळातच रौद्र रूप धारण केलं. सुरुवातीला आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी टीडीआरएफ, आपत्कालीन पथक आणि ठाणे महापालिका अग्निशमन दलाचे 10 बंब व 8 टँकर घटनास्थळी आले. तत्काळ आजूबाजूचा परिसर रिकामा करून वीज बंद करण्यात आली. मात्र, कंपनीत साठा करून ठेवलेल्या काही गॅस सिलेंडरचा ब्लास्ट झाल्यानं आग आटोक्यात येत नव्हती. अखेर मिरारोड, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण मनपाच्या अग्निशमन पथकाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

जी. बी गोदापुरे, ठाणे महानगरपालिका उपायुक्त (Source - ETV Bharat Reporter)

आगीचं कारण अद्याप अस्पष्ट : आग मोठ्या प्रमाणात लागली असल्यानं संपूर्ण कंपनीला आगीनं वेढलं आहे. वेंकटरमना या कंपनीमध्ये चिप्स, वेफर्स तयार केले जातात. आज गांधी जयंतीनिमित्त सुट्टी असतानाही काही कामगार कंपनीत कामाला आले होते. सायंकाळच्या सुमारास अचानक कंपनीत आग लागली. मात्र, आतापर्यंत या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं आपत्कालीन पथकानं सांगितलं. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

हेही वाचा

  1. साताऱ्यात सर्व्हिसिंग सेंटरमध्ये कॉम्प्रेसरचा स्फोट; एक जण जागीच ठार, दोन गंभीर जखमी, पाहा व्हिडिओ - Satara Compressor explosion
  2. वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश; सितारा लॉजमधून थायलंडच्या १५ तरुणींची सुटका - Thane Crime News
  3. धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांनी केली आत्महत्या, मृतकाच्या खिशात सापडली सुसाईड नोट - Nagpur Suicide

ABOUT THE AUTHOR

...view details