महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनोज जरांगे यांचं पुन्हा उपोषणास्त्र: "सरकारला शेवटची संधी, मागेल त्याला कुणबी प्रमाणपत्र द्या" - Manoj Jarange Resume Hunger Strike - MANOJ JARANGE RESUME HUNGER STRIKE

Manoj Jarange Resume Hunger Strike : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून पुन्हा आंदोलन सुरू केलं आहे. ही सरकारला शेवटची संधी असून मागेल त्याला कुणबी प्रमाणपत्र द्या, आमच्या व्याख्येनुसार सगेसोयऱ्यांची अंमलबाजवणी करा, आदी मागण्या मनोज जरांगे यांनी केल्या आहेत.

Manoj Jarange Resume Hunger Strike
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2024, 7:49 AM IST

जालना Manoj Jarange Resume Hunger Strike : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आपलं उपोषणास्त्र बाहेर काढलं आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून मनोज जरांगे यांनी अंरवली सराटी इथं पुन्हा आपलं उपोषण सुरू केलं. मनोज जरांगे यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी "सरकारला ही शेवटची संधी आहे, पुन्हा पुन्हा सांगतो, मग आमच्या नावानं बोंबलत बसायचं नाही. सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी आमच्या व्याख्येनुसार करा. राज्यभरात मागेल त्याला कुणबी प्रमाणपत्र द्या, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या," आदी मागण्या मनोज जरांगे यांनी केल्या. मराठा आरक्षण न मिळाल्यास त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्न व नागरी पुरवठा छगन भुजबळ जबाबदार असतील, असा आरोपही मनोज जरांगे यांनी यावेळी केला.

मनोज जरांगे पुन्हा उपोषणावर :मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी स्थगित केलेलं आंदोलन पुन्हा सुरू केलं आहे. सोमवारी मध्यरात्री मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलनाबाबतची माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार प्रहार केला. "माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. आमचा सगळा समाज हा मराठा, कुणबी एकचं आहे. आम्हाला बाकीच्या विषयावर बोलायचं नाही. मी आंदोलनासाठी कोणाची वाट पाहत नसतो. मी काय मंत्री छगन भुजबळ यांच्यासारखं आंदोलन चालवत नसतो. आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा नंतर आमच्या नावानं बोंबलत बसायचं नाही," असा जोरदार हल्लाबोल मनोज जरांगे यांनी सरकारवर केला.

आरक्षण मिळालं नाही, तर देवेंद्र फडणवीस जबाबदार :मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा आपलं उपोषण सुरू केलं आहे. यावेळीही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, मागेल त्याला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, आमच्या व्याख्येनुसार सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी करावी, अशी आदी मागण्या मनोज जरांगे यांनी केल्या. मराठा आरक्षण न मिळाल्यास त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ हे जबाबदार असतील, असा आरोपही मनोज जरांगे यांनी यावेळी केला.

माझ्या माणसाला खरचटलं नाही पाहिजे :धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी खूप वर्षापासून आहे. गोरगरीब धनगर समाजाच्या लेकरांचं कल्याण झालं पाहिजे, आमचा काही वेगळा विचार करायची गरज नाही. मात्र मंत्री छगन भुजबळ यांना दंगली घडवायच्या आहेत. त्यामुळे धनगर समाजाला सांगतो, उगाच छगन भुजबळांचं ऐकूण फुकट भांडण अंगावर घेऊ नका. तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. मंत्री छगन भुजबळ यांना दोन समाजात भांडणं लावायचे आहेत. त्यामुळे मी गृहमंत्री आणि पोलीस अधीक्षकांना सांगतो, माझ्या माणसाला खरचटलं नाही पाहिजे. हे इथं जमणार नाही. उद्या जर दंगली झाल्या, तर त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ जबाबदार असतील, असा आरोपही मनोज जरांगे यांनी केला.

हेही वाचा :

  1. "राहुल गांधींना प्रश्न विचारायला आम्ही तुमचे नोकर आहोत का?", जरांगे पाटलांचा प्रसाद लाड यांच्यावर हल्लाबोल - Manoj Jarange Patil
  2. "...हा राऊत नाही तर फडणवीसांचा डाव", नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? - Manoj Jarange On Rajendra Raut
  3. "मराठ्यांच्या छाव्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नका", आमदार राजेंद्र राऊतांचं मनोज जरांगेंना आव्हान - Rajendra Raut On Manoj Jarange

ABOUT THE AUTHOR

...view details