ठाणे Man Abused 9 Year Girl :शेजारी राहणाऱ्या 35 वर्षाच्या नराधमानं 9 वर्षाच्या चिमुकलीला शौचालयात नेऊन अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक अत्याचार केल्यानं खळबळ उडाली. या प्रकरणी पीडित चिमुकलीनं आरडाओरड केल्यानं या नराधमानं तिला शिवीगाळ करुन ठार करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचार केल्यानं देशभरात संताप व्यक्त करण्यात येत असताना आता तसाच प्रकार पुन्हा अंबरनाथमध्ये घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
शौचालयात अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक अत्याचार :पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित 9 वर्षाची चिमुकली ही अंबरनाथ पश्चिम परिसरातील एका वस्तीत कुटुंबासह राहते. तर नाराधम हाही पीडितेच्या शेजारी राहणारा असल्यानं ते एकमेकांना ओळखतात. याच ओळखीचा फायदा घेत, पीडित चिमुकलीच्या बालमनाचा फायदा घेऊन तिच्याशी जवळीक साधली. यावेळी त्यानं बहाण्यानं घरासमोरील सार्वजनिक शौचालयात चिमुकलीला बोलावलं. त्यानंतर शौचालयात पीडित चिमुकलीला अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. खळबळजनक बाब म्हणजे हा लैंगिक अत्याचाराचा प्रकार 1 जुलै ते 20 ऑगस्टपर्यंत दुपारच्या सुमारास गुपचूपपणे सुरू होता.