महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राम शिंदे यांना क्लास कसा चालवायचा हे माहित आहे- देवेंद्र फडणवीस - MAHARASHTRA WINTER ASSEMBLY SESSION

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरपंच संतोष देखमुख यांच्या हत्येचा विषय चर्चेत आला आहे. त्यावरून बीडमधील आमदारांनी फास्ट ट्रॅकमध्ये खटला चालवावा, अशी मागणी केली.

Maharashtra winter assembly session 4th Day
विधानसभेचे हिवाळी अधिवेशन (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : 6 hours ago

Updated : 4 hours ago

नागपूर- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी परभणी आणि बीडमधील घटनांवर चर्चा होणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांनी केज पोलिसांवरदेखील कारवाई करावी, अशी मागणी केली.

Live Updates

  • विधान परिषद सभापतीपदी राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. अभिनंदपर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस म्हणाले, " सभापतींची निवड एकमतानं झाली आहे. त्याबद्दल विरोधकांचा आभारी आहे. ते सर असल्यामुळे त्यांना वर्ग कसा चालवायचा आहे, माहित आहे. शिक्षक हा जन्मभर शिक्षकच असतो".
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समोर आंदोलन यावेळी आंदोलनात आदित्य ठाकरे वडेट्टीवार, नितीन राऊत, भास्कर जाधव, विकास ठाकरे अभिजीत वंजारी यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहिले.

पोलिसांनी चुकीची कारवाई केली-खऱ्या गुन्हेगारांना अद्याप अटक नाही, याकडं अमित देशमुख यांनी सभागृहाचं लक्ष वेधले. अमित देशमुख म्हणाले, "महायुती सरकारकडं जनतेनं दुसऱ्यांदा कायदा आणि व्यवस्थेची जबाबदारी सोपविली आहे. अशा घटना पुन्हा घडू नये, याकरिता लक्ष द्यायला पाहिजे. संतोष देशमुख हत्येनंतरील घटनाक्रम कुणालाही मान्य होणार नाही. पोलिसांनी चुकीची कारवाई केली. यावर सरकारची काय भूमिका हे आम्हाला समजले पाहिजे. बीडमधील घटना एवढी अमानुष आहे, त्याचे वर्णन करता येत नाही. गावाचे सर्वेसर्वा सरपंच सुरक्षित नाही. राज्यात अनेक सरपंच आणि नगराध्यक्ष आहेत. त्यांनी राजकारणात यावे का? ते सुरक्षित राहणार का? याकडं सरकारनं लक्ष द्यायला हवे".

व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई द्या-एसआयटीपेक्षा विद्यमान न्यायाधीशांकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली. "परभणीतील सूर्यवंशी या विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणात त्याच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत करावी. तसेच परभणीतील व्यापाऱ्यांना सरकारनं नुकसान भरपाई दिली पाहिजे", अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली.

कराडचे सर्व मोबाईल रेकॉर्ड तपासावेत-आमदार संदीप क्षीरसागर यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी वाल्मिक कराडवर कारवाई करण्याची मागणी केली. आमदार क्षीरसागर म्हणाले, " वाल्मिक कराडमुळे बीड जिल्ह्यात जातीय तेढ निर्माण होत आहे. कोणावरही कुठेही खोटे गुन्हे दाखल होतात. बीड जिल्ह्यातील सर्व घटना पवनचक्की प्रकल्पांच्या रॅकेटमुळे झाल्या आहेत. वाल्मिक कराडचे सर्व मोबाईल रेकॉर्ड तपासावेत. पोलिसांनी देशमुख हत्या प्रकरणी दखल घेतली नव्हती".

हेही वाचा-

  1. विधानसभा हिवाळी अधिवेशन 2024 : संघाच्या शाखेतून माझी सुरुवात, मग शिवसेनेत आलो; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
  2. अमित शाह हे बाबासाहेब यांनी दिलेल्या संविधानामुळेच गृहमंत्री झाले- नाना पटोले
Last Updated : 4 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details