नागपूरVijay Wadettiwar on Tutari : विरोधी पक्षनेतेविजय वडेट्टीवार यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी ते मनोहर जोशी यांच्या सोबतच्या काही जुन्या आठवणीत रमले. ''मला पहिल्यांदा आमदार तसेच महामंडळ जोशी सरांनीचं दिल्याचं ते म्हणाले आहेत. मी अनेक वर्षे त्यांच्यासोबत काम केलं. सर शिस्तीचे होते. पण, मनानं मात्र कोमल होते. त्यांनी बाळासाहेबांशी निष्ठा अखेरपर्यंत कायम ठेवली.
प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत येतील: ''वंचितला सोबत घेण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. ते जिथं म्हणतील तिथं चर्चा करू तशी आमची तयारी आहे. विश्वास आहे की, प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत येतील. अजून २७ फेब्रुवारी ही तारीख महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी निश्चित झालेली नाही. महाविकास आघाडीच्या बैठकीची तारीख ठरलेली नाही. बैठक निश्चित झाल्यावर प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण दिलं जाईल'', असं काँग्रेस नेते वडेट्टीवार म्हणाले.
माझी अनेक वर्षांची त्यांच्याशी ( मनोहर जोशी ) ओळख होती. सर मृदूभाषी, विद्वान आणि अभ्यासू नेते होते. कुठलंही काम वेळेत पूर्ण करणारे आणि वेळेत कुठेही जाणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख होती. मुंबईतील उड्डाणपूल, पुणे मुंबई एक्स्प्रेस वे हे जोशी सरांच्या काळातचं झालेत. महाराष्ट्राच्या इतिहासात उत्तम मुख्यमंत्री म्हणून ज्यांची नोंद आहे-विजय वडेट्टीवार