महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हेलिकॉप्टरने मतदारांना घेऊन या, संजय मंडलिक यांना निवडून द्या, प्रचार सभेत मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Kolhapur Lok Sabha : कागल विधानसभा मतदारसंघातील एकेकाळचे कट्टर विरोधक आता एकत्र आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगे (Samarjit Ghatge) आणि आणि माझी मतं महायुतीचे उमेदवार मंडलीक यांना मिळाली तर त्यांचा विजय परमेश्वरही रोखू शकत नाही असा दावा केला आहे. ते आज शनिवार (दि. 6 एप्रिल) रोजी कापशी येथे मंडलीक यांच्या प्रचारार्थ सभेत बोलत होते.

हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 6, 2024, 10:23 PM IST

Updated : Apr 6, 2024, 10:35 PM IST

हसन मुश्रीफ

कोल्हापूर : Kolhapur Lok Sabha : कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघात भाजपा नेते समरजित घाटगे आणि मला जेवढे 2019 च्या विधानसभेला मतदान झाले तेवढे आता झाले, तर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव साक्षात परमेश्वर जरी आला तरी होणार नाही. तसंच, आपल्याला मनापासून काम केलं पाहिजे आणि लाखाचं लीड दिलं पाहिजे, हवं तर हेलिकॉप्टरने मतदारांना घेऊन या पण जास्तीत जास्त मतदान होऊ देत असं वक्तव्य राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केलं आहे. सेनापती कापशी येथे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.

मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, होता वही है जो मंजूरे खुदा होता है : कार्यकर्त्यांना संबोधित करताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, आपापसातलं राजकारण करून मंडलिक यांना अडचणीत आणू नका, जे कपाळावर लिहिलेलं असतं ते मिळतंच. पुढच्या विधानसभा निवडणुकीचा मंडलिक यांच्याकडून कोणताही शब्द घेऊ नका, पुढच्या विधानसभा निवडणुकीत माझ्याविरोधात समरजित घाटगे हेच उमेदवार असणार आहेत. मात्र, आता आपण मंडलिक यांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेऊयात. तसंच, यावेळी खास शायरी म्हणत मुश्रीफ यांनी भाजपा नेते समरजित घाटगेंना आवाहन करत "मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, होता वही है जो मंजूरे खुदा होता है" असं म्हणत विजयाचा दावा केला आहे.

टोकाचा राजकीय संघर्ष :2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लढलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार समरजित घाडगे यांनी 90 हजारांच्या घरात मतं घेतली होती. यानंतर दोघांच्यात टोकाचा राजकीय संघर्ष झाला. मंत्री मुश्रीफ यांच्या साखर कारखाना आणि निवासस्थानावर ईडीने टाकलेल्या छाप्यामध्ये समरजित घाटगे यांनी मदत केल्याचा आरोपही मंत्री मुश्रीफ यांच्याकडून झाला होता. यानंतर हा वाद पोलीस स्टेशनच्या दारापर्यंत गेला होता. त्यानंतर आता महायुतीमध्ये भाजपा नेते समरजित घाटगे, मंत्री हसन मुश्रीफ आणि विद्यमान खासदार संजय मंडलिक महायुतीचा भाग झाले आहेत. यामुळे विधानसभेला पुन्हा एकदा दोघांच्या राजकीय संघर्ष होणार का? याकडे आता राजकीय विद्यापीठ अशी ओळख असलेल्या कागलचं लक्ष लागलं आहे.

Last Updated : Apr 6, 2024, 10:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details