महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इचलकरंजी महानगरपालिकेत दोन आयुक्तात रंगला 'खुर्चीवाद', दोघांनीही थाटल्या एकाच दालनात खुर्च्या - Ichalkaranji Commissioner Dispute

Ichalkaranji Commissioner Dispute : इचलकरंजी महापालिकेतील आयुक्त ओमप्रकाश दिवटे तसंच पल्लवी पाटील यांनी एकाच दालनात एकाच टेबलपुढे खुर्च्या थाटल्या आहेत. त्यामुळं दोन्ही आयुक्तात खुर्चीवरून वाद रंगल्याची चर्चा आहे.

Commissioner Omprakash Divte and Pallavi Patil
आयुक्त, ओमप्रकाश दिवटे तसंच पल्लवी पाटील (ETV BHARAT Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 14, 2024, 5:32 PM IST

कोल्हापूरIchalkaranji Commissioner Dispute :इचलकरंजी महानगर पालिकेत नेमकं चाललय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. कारण महानगर पालिकेचा मुख्य कारभार पाहणाऱ्या आयुक्त पदावरून सध्या दोन अधिकाऱ्यात 'खुर्ची'वाद रंगला आहे. अखेर मंत्रालयातून फोन आल्यानंतर ओमप्रकाश दिवटे यांची खुर्ची कायम राहिली.

दिवटे यांच्या बाजूनं निकाल :इचलकरंजी महानगर पालिका निर्माण झाल्यापासून कायम चर्चेत असते. महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत असलेले ओमप्रकाश दिवटे यांची बदली करण्यासाठी काही राजकीय नेत्यांचा दबाव होता. यातून त्यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागी दोन दिवसांपूर्वी साताऱ्याच्या पल्लवी पाटील यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी 11 जून रोजी सायंकाळी पदभार स्वीकारला. मात्र एक वर्षाच्या आतच दिवटे यांची बदली झाल्यानं या विरोधात त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण बोर्डात धाव घेतली होती. त्यावेळी न्यायाधिकरणानं दिवटे यांच्या बाजूनं निकाल देत त्यांची आयुक्तपदी नियुक्ती कायम ठेवली.

ओमप्रकाश दिवटे यांना पदभार घेण्याच्या सूचना :निकालानंतर आज ओमप्रकाश दिवटे सकाळी कार्यालयात येण्यापूर्वी आयुक्त पल्लवी पाटील खुर्चीवर येऊन बसल्या. इतक्यात ओमप्रकाश दिवटे आयुक्त दालनात दाखल झाले. त्यांनी न्याधिकरणानं दिलेला निर्णय त्यांना सांगितला. मात्र, पल्लवी पाटील यांनी आपल्याला आदेश मिळाला नसल्याचं सांगत खुर्चीवरून उठण्यास नकार दिला. त्यामुळं दिवटे यांनी बाजूला बसून कामाला सुरुवात होती. यानंतर मंत्रालयातून फोन आल्यानंतर पल्लवी पाटील निघून गेल्या. इचलकरंजी महापालिकेतील आयुक्त पदावरून झालेला वाद आता शमला आहे. 'मॅट'नं या प्रकरणासंबंधी ओमप्रकाश दिवटे यांना पदभार घेण्याच्या सूचना केल्या आहेत. या विषयाचे पत्र दिवटे यांना आजच मिळालं आहे.

'हे' वाचलंत का :

  1. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारण्यासाठी देवेंद्र फडणवीस लागले कामाला; निवडणुकीसाठी कसली कंबर - Devendra Fadnavis
  2. लोकसभेत आम्ही दोनच जागा लढवल्या, मग 48 मतदारसंघात कसा परिणाम दिसला? छगन भुजबळांचा सवाल - Chhagan Bhujbal
  3. लोकसभेत आम्ही दोनच जागा लढवल्या, मग 48 मतदारसंघात कसा परिणाम दिसला? छगन भुजबळांचा सवाल - Chhagan Bhujbal

ABOUT THE AUTHOR

...view details