महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नोकरीच्या अमिषानं घेतले तरुणाचे कागदपत्रं; बँक खाते काढून 380 कोटी रुपयाचा गोलमाल; भामट्यांविरोधात गुन्हा - Fraud with Youth For Given Job Lure

Fraud with Youth For Given Job Lure : तरुणाला नोकरीचं आमिष देऊन घेतलेल्या कागदपत्रांवर बनावट बँक खाते उघडण्यात आले. या खात्यावरुन भामट्यांनी तब्बल 383 कोटी रुपयाचा व्यवहार केल्यानं मोठी खळबळ उडाली.

Fraud with Youth For Given Job Lure
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2024, 7:38 AM IST

Updated : Sep 24, 2024, 2:16 PM IST

ठाणे Fraud with Youth For Given Job Lure:नोकरीचं आमिष दाखवून घेतलेल्या कागदपत्रावर बँकेत खातं उघडून कोट्यवधी रुपयाचा व्यवहार करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं या खात्यावरुन कोट्यवधी रुपयाचा आर्थिक व्यवहार झाल्यानं खातेधारक प्रमोद गोपाळ पानगल याला चौकशीला बोलावलं. मात्र याबाबत त्याला काहीच माहिती नसल्याचं पुढं आलं. या प्रकरणी पोलिसांनी दिपक शुक्ला, राहूल पटवा, चेतन खाडे यांच्यावर 383 कोटी रुपयाचा बेकायदेशीर व्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

नोकरीच्या आमिषानं घेतली कागदपत्रं अन् उघडलं बँक खाते :दिवा पूर्व भागात रहाणाऱ्या प्रमोद गोपाळ पानगले (38) याच्याकडून विविध दस्तावेज घेऊन त्याद्वारे कोटक बँक आणि ए यु फायनान्स बँक शाखा कासारवडवली इथं भामट्यांनी खाते उघडले. या दोन्ही बँकेचे चेक सही करुन घेत बँकेत अनोळखी मोबाईल नंबर नोंद केला. दीपक शुक्ला, राहूल पटवा, चेतन खाडे यांनी बँकेत तक्रारदार प्रमोद पानगल याच्या नकळत 380 कोटींचा व्यवहार केल्याचं समोर आलं. या प्रकरणी प्रमोद पानगल यांनी आर्थिक फसवणूक प्रकरणी ठाणे शहर आर्थिक गुन्हे शाखेकडं तक्रार अर्ज केला. अखेर आर्थिक गुन्हे शाखा ठाणे शहरचे पोलीस निरीक्षक सतिषचंद्र राठोड यांनी दाखल तक्रारीवरुन तिघांवर 380 कोटींचा बेकायदेशीर व्यवहार केल्याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

नोकरीच्या अमिषानं घेतले तरुणाचे कागदपत्रं; बँक खाते काढून 380 कोटी रुपयाचा गोलमाल (Reporter)

कशी केली भामट्य़ांनी फसवणूक ? :तक्रारदार प्रमोद गोपाळ पानगल हे दिवा परिसरात ईस्टेट एजंट म्हणून व्यवसाय करत होते. त्यांच्या परिचयाचा डोंबिवलीत राहणारा चेतन खाडे यानं मोबाईलवर संपर्क साधून महिन्याला 20 हजाराचा पगार मिळेल, असं आमिष त्यांना दाखवलं. खाडे यानं मालाड इथं राहणाऱ्या राहुल पटवा याच्याशी त्यांची ओळख करुन दिली. दोघांनी तक्रारदाराचं आधारकार्ड, पॅनकार्ड, फोटो आणि जुन्या बँक खात्याचा एक सही केलेला बँकेचा चेक सोबत आणायला सांगून काळबादेवी मुंबई इथं बोलावलं. तिथं दीपक शुक्ला याच्याशी भेट करुन दिली. दीपक शुक्ला याच्या कार्यालयात त्यांचं बँक खाते उघडण्यासाठी बँकेचे प्रतिनिधी आले. त्यांनी ओळखपत्रं घेऊन फोटो काढले आणि प्रमोद यांचा व्हिडिओ बनवला. कोटक बँक खात्यावर पगार येईल, असं सांगून चार दिवसांनी दीपक शुक्ला, चेतन खाडे आणि राहुल पटवा हे दिवा इथं भेटण्यास प्रमोद यांच्या घरी आले.

नोकरीसाठी घेऊन गेले काळबादेवीला :दिवा इथं भेटल्यानंतर त्यांनी प्रमोद यांना त्यांना मुंबईतील काळबादेवी इथं दीपक शुक्ला याच्या कार्यालयात घेऊन गेले. त्यावेळी दीपक शुक्ला आणि राहूल पटवा यांनी नोकरीसाठी लागणारे काही कागदपत्रं दाखवून त्यावर सही घेतली. त्याचवेळी कोटक बँकेच्या 5 चेक्सवर सह्या घेतल्या. यानंतर त्यांनी नोकरीसाठी दहा- बारा दिवसांनी परत यावं लागेल, असं सांगून प्रमोद यांना घरी जाण्यास सांगितलं. कोटक बँकेचे खाते तांत्रिक कारणास्तव रद्द झालं. पुन्हा कागदपत्र आणि सह्या घेऊन ए यु फायनान्स बँक ठाणे इथं खातं उघडलं. या दोन्ही बँकेत रजिस्टर नंबर हा भलताच टाकण्यात आला. तर बँकेचे आलेल्या मेसेजकडं लक्ष देऊ नका, असंही प्रमोद यांना सांगितलं. दोन्ही बँकेत त्रिकुटानं वेगळे मोबाईल देऊन ओटीपी आणि इतर कामासाठी वापर केला. तर तिघांनी संगनमत करीत दोन्ही बँकेत प्रमोद यांच्या नावानं असलेल्या बँकेत प्रमोद कार्पोरेशन शॉप नं-17, दुसरा मजला, धन भवन, जुने हनुमान फस्ट एक्स लेन, एमजे, मुंबई 400 042 या प्रोप्रायटरशीप फर्मच्या नावानं कोटक बँक इथं बँक खाते उघडण्यात आलं. संपर्कासाठी प्रमोदच्या नावाचा बनावट मेल तयार करून दोन्ही बँकेतून तब्बल 383 कोटी 83 लाख 63 हजाराचा व्यवहार केला. याबाबत तक्रारदार प्रमोद पानगल यांना कुठल्याच प्रकारची कल्पना नव्हती. तिन्ही आरोपी हे मोबाईल, ओटीपी आणि मेलद्वारे बँक व्यवहार परस्पर करत होते. मोठ्या रकमेची आवक जावक झाल्यानं ठाणे शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या विभागानं प्रमोद पानगल यांना विचारणा केली. त्यांनी नोंदविलेल्या जबाबांमध्ये सदरचं प्रकरण समोर आलं. त्यामुळे प्रमोद पानगल यांनी 21 तारखेला या त्रिकुटाविरोधात तक्रार दाखल केली.

हेही वाचा :

  1. मंत्री धनंजय मुंडेंच्या नावाचा गैरवापर; आमदार कोट्यातील घर देतो सांगून महिला अधिकाऱ्याला घातला गंडा - Dhananjay Munde Name Fraud
  2. माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंच्या अडचणी वाढल्या : पैसे उकळल्याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल - FIR Against EX DGP Sanjay Pande
  3. फसवणूक प्रकरणी मनोज जरांगेंना दिलासा; अटक वॉरंट न्यायालयाकडून रद्द, 3 सप्टेंबरला होणार पुढील सुनावणी - Manoj Jarange Gets Relief
Last Updated : Sep 24, 2024, 2:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details