महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्याच्या माजी राज्यमंत्री रजनी सातव यांचं निधन

Rajni Satav Death : माजी राज्यमंत्री रजनी सातव यांचं निधन झालं आहे. त्या दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या आई होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी कळमनुरीत अंत्यसंस्कार होतील.

Rajni Satav
Rajni Satav

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2024, 6:35 AM IST

Updated : Feb 19, 2024, 6:47 AM IST

नांदेड Rajni Satav Death : राज्याच्या माजी मंत्री रजनी सातव यांचं रविवारी (18 फेब्रुवारी) निधन झालं. त्या 76 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पार्थिवावर आज (19 फेब्रुवारी) दुपारी कळमनुरी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

रजनी सातव यांची कारकीर्द : रजनी सातव ह्या दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या आई होत्या. त्यांचं कुटुंब गेल्या 43 वर्षांपासून राजकारणात आहे. त्यांची सून प्रज्ञा सातव ह्या विधानपरिषद आमदार आहेत. रजनी सातव यांनी राज्याचं आरोग्य आणि समाजकल्याण राज्यमंत्रिपद भूषविलं आहे. तसेच त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा देखील होत्या. रजनी सातव 1980 ते 1990 दरम्यान कळमनुरीतून विधानसभा आमदार, तर 1994 ते 2000 दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेच्या आमदार होत्या.

राज्यमंत्री राहिल्या : रजनी सातव ह्या मुळच्या पुण्याच्या होत्या. त्यांचा जन्म 13 जुलै 1949 रोजी पुण्यात झाला होता. त्यांनी बीएससी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. तसेच त्यांच्याकडे कायद्याचीही पदवी होती. रजनी सातव यांनी 1986 मध्ये शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, समाज कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होत्या. तसेच त्या 1988 मध्ये शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, समाज कल्याण राज्यमंत्री होत्या.

राजकारणातून अलिप्त : रजनी सातव यांनी काँग्रेस प्रदेश संघटनेमध्ये देखील अनेक वर्ष काम केलं आहे. मात्र 2021 मध्ये मुलगा राजीव सातव यांच्या अकाली निधनानंतर त्या राजकारणातून अलिप्त झाल्या होत्या. रविवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथे त्यांची प्राणज्योत मालवली.

हे वाचलंत का :

  1. Bharat Jodo Yatra : राहुलच्या रूपाने माझा राजूच घरी येतोय; माजी मंत्री रजनी सातव यांची भावना
  2. Rajni Satav मुद्द्याचे राजकारण आता गुद्द्यावर आले आहे, रजनी सातव
Last Updated : Feb 19, 2024, 6:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details