महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई विमानतळावर मोठा अनर्थ टळला;  ज्वलनशील पदार्थ बाळगल्याप्रकरणी पाच जणांना अटक - Mumbai Airport - MUMBAI AIRPORT

Mumbai Airport : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ज्वलनशील पदार्थ बाळगल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी पाच लिटर हायड्रोजन परॉक्साईड आणि पाच किलो टायटॅनिम डायऑक्सइडची पावडर जप्त केली.

Mumbai Airport
मुंबई विमानतळ (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 17, 2024, 10:42 PM IST

Updated : Aug 18, 2024, 10:42 AM IST

मुंबई Mumbai Airport :छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ज्वलनशील पदार्थ बाळगल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आधी समीर बिश्वास (वय 32) या प्रवाशाला अटक करण्यात आली. तो विमान क्रमांक ET 641 या मुंबई ते अदिस अबाब या विमानातून कांगो या ठिकाणी जाणार होता. मात्र, या विमानात सामान लोड करत असताना समीरच्या बॅगनं पेट घेतला. सामान लोड करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान बाळगून आग आटोक्यात आणली. याबाबत सहार पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चौकशीत त्याच्या बॅगमध्ये ज्वलनशील पदार्थ असल्याचं समोर आलं. ज्वलनशील पदार्थ विमानतळापर्यंत आणण्यासाठी त्याच्या चार मित्रांनी त्याला मदत केली. त्यांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आलीय.

पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter)

कांगोमध्ये नेणार होता ज्वलनशील पदार्थ :पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी समीर बिश्वास हा मूळचा कोलकाताचा आहे. तो कांगो येथं नोकरीनिमित्तानं जाणार होता. कांगो येथे राहणारा भारतीय इसम नवीन शर्मा याच्या कार्यालयात मॅनेजर पदावर समीर काम करणार होता. समीर हा विमानातून नेत असलेले ज्वलनशील पदार्थ हे नवीन शर्मा याला देणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पाच जणांना अटक : अंबरनाथ येथे राहणारा विश्वनाथ बालासुब्रमणि सेंजूनधर आणि नवी मुंबईत राहणारा सुरेश सिंह या दोघांनी ज्वलनशील पदार्थ नंदन यादव याला दिला. यानंतर नंदनने अखिलेश यादव या तरूणाच्या मदतीने आरोपी प्रवासी असलेल्या समीरकडे ज्वलनशील पदार्थ विमानतळा बाहेर सुपूर्द केला. याप्रकरणी समीर बिश्वास, नंदन यादव, सुरेश सिंग, विश्वनाथ सेंजूनधर आणि अखिलेश यादव या आरोपींना अटक करण्यात आलीय. पोलिसांनी पाच लिटर हायड्रोजन परॉक्साईड आणि पाच किलो टायटॅनिम डायऑक्सइडची पावडर समीर बिश्वासकडून जप्त केली.

ज्वलनशील पदार्थ मागवला त्याच्यावरही कारवाई :याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 125,327,61(2) आणि नागरी विमान वाहतूक कायद्या कलम 3 (1) (क) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणी कांगो येथील नवीन शर्मा ज्यानं हा ज्वलनशील पदार्थ मागवला होता, त्याला देखील या गुन्ह्यात आरोपी बनवण्यात आलं असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी दिली.

हेही वाचा

  1. शाळेच्या शौचालयात दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार, 23 वर्षीय नराधमाला ठोकल्या बेड्या - Thane Rape News
  2. जिल्हा परिषद शाळेतील दोनशे विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा - Biscuits poisoned students
  3. मोठी बातमी! वाशीतील इनॉर्बिट मॉलसह 26 मॉल्समध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी - Vashi Bomb Threat
Last Updated : Aug 18, 2024, 10:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details