महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

१४ कोटी रुपयांचं गव्हर्मेंट शेअर्स फसवणूक प्रकरण; आरोपीच्या कोलकात्यातून आवळल्या मुसक्या - Government Shares Case - GOVERNMENT SHARES CASE

Government Shares Case : गव्हर्मेंट शेअर्स प्रकरणात 14 कोटींची अफरातफर करणाऱ्या आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी कोलकाता येथून अटक केली आहे. चेतन भूपेंद्र शाह (वय 61) असं आरोपीचं नाव आहे. जाणून घ्या सविस्तर प्रकरण...

Government Shares Case
फाईल फोटोे (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 20, 2024, 4:20 PM IST

Updated : Jun 20, 2024, 5:24 PM IST

मुंबईGovernment Shares Case: आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी कोलकाता येथून गव्हर्मेंट शेअर्स प्रकरणात 14 कोटींची अफरातफर करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी 2023 मध्ये आर्थिक गुन्हे शाखेमध्ये भारतीय दंड संविधान कलम 420, 465, 467, 468, 471 आणि 120 ब अन्वये चेतन भूपेंद्र शाहच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चेतन भूपेंद्र शाह (वय 61) याला कोलकत्यातून 18 जून रोजी अटक करण्यात आली असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त निशिथ मिश्रा यांनी दिली आहे.


चेतन शाह लपला होता हॉटेलात :आरोपी चेतन भूपेंद्र शाह याला 18 जून रोजी कोलकाता येथील न्यू मार्केट पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अटक करण्यात आली. त्यानंतर कोलकाता येथील सीएमएम कोर्ट येथे आरोपीला ट्रान्झिट रिमांडसाठी हजर करण्यात आलं. न्यायालयानं 23 जून पर्यंत ट्रान्झिट रिमांड मंजूर केला असून चेतन शाह हा आरोपी मूळचा गोरेगाव पूर्व येथे राहणारा आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हे शाखेच्या कक्ष 6 च्या मदतीनं 61 वर्षीय व्यावसायिक असलेल्या चेतन शाह याला न्यू मार्केट हॉटेलमधून अटक केली आहे. हा आरोपी मंगळवारी संध्याकाळी या हॉटेलमध्ये लपला होता आणि त्याला स्थानिक न्यायालयात हजर केलं. सध्या त्याच्या ट्रान्झिट रिमांडची मागणी करण्यात आली आहे.

आरोपीनं क्लायंट डेटावर मिळवला प्रवेश :मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथे राहणारा चेतन भूपेंद्र शाह असं या आरोपीचं नाव असून तो गव्हर्नमेन्ट शेअर्स फसवणुकीच्या प्रकरणात सामील होता. ज्यामध्ये देशातील एका आघाडीच्या ब्रोकिंग आणि गुंतवणूक फर्मची 14.1 कोटी रुपयांहून अधिक फसवणूक करण्यात आली होती. आरोपी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ब्रोकिंग फर्मच्या क्लायंट डेटावर कथितपणे प्रवेश केला आणि त्यांचे शेअर्स बेकायदेशीरपणे ऑपरेट केले आणि नफा कमावला. त्यामुळे कंपनीचं 14 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झालं, असा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी गेल्या वर्षी गुन्हा दाखल करण्यात आला असून यापूर्वीही याप्रकरणी अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या व्यक्तीला 18 जूनला रात्री न्यू मार्केट पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि बुधवारी म्हणजेच काल त्याच्या ट्रान्झिट रिमांडसाठी सीएमएमसमोर हजर करण्यात आलं. 23 जून पर्यंत ट्रांझिट रिमांड मिळाला असून आरोपीला पोलीस मुंबईत घेऊन येत आहेत.

हेही वाचा :

  1. विदर्भात दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षाच, तर राज्यात 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट - Maharashtra Weather Forecast
  2. तामिळनाडुत भेसळयुक्त दारूमुळं 35 जणांचा मृत्यू; एसपीसह 9 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन - Hooch Tragedy in Tamil Nadu
  3. रवींद्र वायकरांना खासदार म्हणून शपथ देऊ नये, थेट लोकसभेच्या सरचिटणीसांना नोटीस - Ravindra Waikar
Last Updated : Jun 20, 2024, 5:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details