पुणे Deputy CM Ajit Pawar : पुणे शहरातील कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणात त्या अल्पवयीन मुलाला जामीन मिळाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. याबाबत आता राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे शहराचे पालकमंत्री अजित पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, या घटनेत कुठल्याही राजकीय पक्षाचा तसेच राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ न देता ही घटना अतिशय गंभीर असून अशा प्रकारच्या गोष्टी कदापि घडता कामा नये. यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अस यावेळी अजित पवार म्हणाले.
गृहमंत्र्यांचे घटनेवर जातीनं लक्ष :पुण्यातील धायरी येथे एका शोरुम चे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी अजित पवार म्हणाले की, पुण्यामध्ये मधल्या काळामध्ये जी घटना घडली त्याच्या संदर्भात २० तारखेला मुंबईचं शेवटं मतदान होतं. मी 21 तारखेला आणि 22 तारखेला दोन्ही दिवस सकाळी नऊ वाजल्यापासून मंत्रालयामध्ये होतो आणि या सगळ्या घटनेच्या संदर्भामध्ये मी लक्ष ठेवून होतो. माझा देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झालं. देवेंद्रजी म्हणाले, मी तातडीने पुण्याला निघालेलो. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः जातीनं त्यांनी लक्ष घालून त्यांनी स्वतः प्रेस घेतली; कारण नसताना एक अशा प्रकारचा गैरसमज समाजामध्ये करून दिला जातो की, याच्यात पालकमंत्र्यांचं लक्ष नव्हतं. कोणी लक्ष घातलं नाही. मला मीडियाच्या पुढे यायला आवडत नाही. मीडियाचे अनेक लोकांना माहिती आहे मी माझं काम करत असतो. आजही 21 तारखेला सकाळी नऊला मंत्रालयात होतो.