महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'...तर पवारांची औलाद सांगणार नाही'; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं - Ajit Pawar Wai Sabha - AJIT PAWAR WAI SABHA

Ajit Pawar Wai Sabha : शब्दाला पक्का, वक्तशीर, स्पष्टवक्ता म्हणून अजित पवारांना ओळखलं जातं. शनिवारी वाईतील सभेत बोलताना उदयनराजे भोसलेना निवडून द्या, नंतर नितीन पाटलांना खासदार करतो. मी शब्द पाळला नाही, तर पवारांची औलाद सांगणार नाही, असं जाहीर वक्तव्य त्यांनी केलंय.

Ajit Pawar Wai Sabha
अजित पवार (Etv Bharat Satara Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 10:57 PM IST

Updated : May 4, 2024, 11:03 PM IST

अजित पवार यांचं भाषण (Etv Bharat Satara Reporter)

सातारा Ajit Pawar Wai Sabha: महायुतीचे उमेदवार उदयनराजेंना निवडून दिलं तर, जूनमध्ये नितीन पाटील यांना राज्यसभेचा खासदार करतो. जर शब्द पाळला नाही, तर पवारांची औलाद सांगणार नाही, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदार मकरंद पाटलांच्या कार्यकर्त्यांना दिला.

एकेक खासदार दिल्लीला गेला पाहिजे :सातारा लोकसभा मतदार संघातील उमेदवारीवरून बोलताना अजित पवार म्हणाले की, राजकारणात चार पावलं मागं पुढे करावं लागतं. उदयनराजेंना उमेदवारी मिळाली आहे. ते सातारच्या गादीचे वारस आहेत. मी आज तुमच्याकडं विकासाकरिता मते मागायला आलो आहे. एकेक खासदार मोदींना पाठिबा देण्यासाठी दिल्लीला गेला पाहिजे, असं अजितदादांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बजावलंय.

उदयनराजेंना निवडून द्या, कामाचं माझ्यावर सोडा : अजित पवार पुढं म्हणाले, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा जिल्ह्यात तुम्ही राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाचा खासदार निवडून देत आहात. यंदाच्या निवडणुकीत वेगळ्या चिन्हाचं बटण दाबताना तुमच्या मनात वेगळी भावना आणू नका. महायुतीचे उमेदवार उदयनराजेंना निवडून द्या, कामाचं माझ्यावर सोडा. वाई, महाबळेश्वर खंडाळ्यातून लाखाचं मताधिक्यानं निवडून दिल्यानंतर जूनमध्ये मी नितीन पाटलांना खासदार करतो. दोन खासदार झाल्यानंतर विकासकामे गतीनं होतील, असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केला.

यशवंतरावांना भारतरत्न मिळवणारच : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, याची मागणी उदयनराजे यांनी केलेली आहे. माझ्या जाहीरनाम्यात देखील ही मागणी आहे. त्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करून चव्हाण साहेबांना आम्ही भारतरत्न मिळवणारच, असा ठाम निर्धार अजितदादांनी बोलून दाखवला.

हे वाचलंत का :

  1. महायुतीसाठी राज ठाकरेंची पहिली सभा; उद्धव ठाकरेंवर निशाणा, नारायण राणेंचं कौतुक - Raj Thackeray Sabha
  2. नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, कोण कुणाशी कधी लग्न करतं अन्... - Lok Sabha Election 2024
  3. दक्षिण मुंबईच्या विकासासाठी पुन्हा संसदेत जाणार - अरविंद सावंत - Lok Sabha Election 2024
Last Updated : May 4, 2024, 11:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details