महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात आषाढी एकादशीनिमित्त विशेष पदार्थ उपलब्ध; पारंपरिक पदार्थांबरोबर नवीन मिठाई लोकांच्या पसंतीस - Fasting on Ashadhi Ekadashi 2024 - FASTING ON ASHADHI EKADASHI 2024

Fasting on Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशीच्या दिवशी (Ashadhi Ekadashi 2024) उपवासाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांना वेगवेगळ्या उपवासाच्या चवीच्या पदार्थांचा आस्वाद ठाण्यात घेता येणार आहे. ठाण्यातील प्रशांत कॉर्नर (Prashant Corner) या मिठाईच्या दुकानांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त विशेष पदार्थ उपलब्ध करण्यात आले आहेत.

Fasting on Ashadhi Ekadashi 2024
आषाढी एकादशी निमित्त विशेष पदार्थ (ETV BHARAT Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 16, 2024, 10:16 PM IST

ठाणे Fasting on Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशी अवघ्या काही तासावर येऊन ठेपली आहे. पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या (Vitthal Rukmini) दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक दाखल झाले आहेत. टाळ, मृदुंग आणि विठू माऊलीच्या गजरात उभी पंढरी न्हाऊन निघाली आहे. आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2024) आणि उपवास हे पिढ्यानपिढ्या सुरू असलेल्या समीकरण यंदाही कायम राहणार आहे. या एकादशीच्या दिवशी उपवासाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांना वेगवेगळ्या उपवासाच्या चवीच्या पदार्थांचा आस्वाद ठाण्यात घेता येणार आहे.

प्रतिक्रिया देताना हरेश बोबडे (ETV BHARAT Reporter)

उपवासाचे नवीन पदार्थ : आषाढी एकादशी म्हणजे विठुरायाच्या चरणी लीन होण्याचा दिवस आणि या दिवशी लोकांचा उपवास असतो. या उपवासाच्या निमित्ताने साबुदाणा वडा आणि साबुदाणा खिचडी याला पर्याय म्हणून ठाण्यातील एका मिठाई विक्रेत्याने उपवासाचे नवनवीन पदार्थ तयार केले आहेत. ठाणेकरांना या उपवासाच्या पदार्थाचा आनंद घेता येणार आहे. या पदार्थांसोबत उपवासाची मिठाई देखील बनवण्यात आली आहे. ज्यामध्ये चार प्रकारच्या मिठाई असून गोड खाणाऱ्या नागरिकांना या मिठाईंचा आनंद घेता येणार आहे.

नागरिकांना मिळणार आनंद : ठाण्यातील सोन्याची मिठाई बनवणाऱ्या प्रशांत कॉर्नर यांनी आषाढी एकादशीनिमित्त साबुदाणा वडा सोबत वेगवेगळ्या ड्रायफ्रूट चक्क्या आणि चिवडे बाजारात आणले आहेत. हे पदार्थ एकादशीनिमित्त दिवसभर नागरिकांना मिळणार आहेत. याचा आनंद घेण्यासाठी ठाणेकर मोठ्याप्रमाणात येणार असा आत्मविश्वास विक्रेत्यांना आहे.


नवनवीन मिठया तयार करणे अशी ओळख : प्रसिद्ध असलेल्या मिठाई विक्रेत्यांनी नवनवीन प्रकारच्या मिठाया तयार करून त्या आकर्षक पॅकिंगमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रत्येक सणानिमित्त वेगवेगळे पदार्थ आणण्याची प्रथा अनेक वर्षांपासून ठाण्यात सुरू आहे. या प्रथेला ठाणेकर देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत.

हेही वाचा -

  1. आषाढी एकादशी 2024; महाराष्ट्रीयन स्टाईल उपवासाच्या पाच रेसिपी, खास तुमच्यासाठी - Ashadhi Ekadashi Recipes
  2. आषाढी एकादशी 2024 : 'या' पद्धतीनं विठ्ठलाची करा पूजा; जाणून घ्या विधी आणि महत्व - Ashadhi Ekadashi 2024
  3. आषाढी एकादशी 2024; पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी - Ashadhi Ekadashi 2024

ABOUT THE AUTHOR

...view details