ठाणेJaljeevan Mission Scheme: 'हर घर नळ' योजनेद्वारे देशातील कोट्यवधी कुटुंबीयांना त्यांच्या घरामध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर 'जलजीवन मिशन योजना' राबविण्यात आली. (PM Narendra Modi) विशेष म्हणजे, ठाण्यात या योजनांचे भूमिपूजन भिवंडी लोकसभेचे खासदार तथा केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पार पडले होते. (BJP Leader Ramnath Patil) असे असताना त्यावर भाजपा पदाधिकारी यांनी आक्षेप घेतल्यानं भाजपा गोटात खळबळ उडाली आहे. भिवंडी तालुक्यातील सुमारे २०० गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाण्याची पाईप लाईन टाकणे, पाण्याची टाकी बांधणे, नवीन पाण्याची सम टाकी बांधणे आणि इतर सुविधांसाठी सुमारे 357 कोटी 48 लाख 35 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला (Minister of State Kapil Patil) असल्याचा दावा रामनाथ पाटील यांनी पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या निवेदनात केला आहे.
एसआयटी, सीबीआय चौकशीची मागणी:भिवंडीतील सुमारे 34 गावांमध्ये स्टेम प्राधिकरण तर 63 गावांमध्ये मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरून नळ जोडणी देऊन 97 गावांमध्ये पाण्याचा मुबलक पुरवठा नळाद्वारे होत आहे. या गावांमध्ये नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे; मात्र तरीही अधिकाऱ्यांनी टक्केवारीच्या लालसेपोटी ही योजना राबविली असून या गावांमध्ये राबविलेल्या योजनेत सुमारे 162 कोटी 52 लाख 55 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्यानं या सर्व प्रकरणांची एसआयटी आणि सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे निमंत्रित प्रदेश सदस्य तथा ठाणे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस रामनाथ पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.