मुंबईAtul Londhe On Budget 2024 :मोदी सरकार त्यांच्या शब्दावर जागलं आहे का? यावरून काँग्रेसने सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर दुसरीकडे सर्वसमावेशक विचार करूनच हा अर्थसंकल्प मांडला गेल्याचं भाजपानं सांगितलं आहे.
मोदींच्या आश्वासनाची पूर्तता कधीच झाली नाही :या बजेट बद्दल बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले आहेत की, काँग्रेसच्या जाहीरनाम्याची कॉपी मोदींपासून अजित पवारांपर्यंत सर्वच करत आहेत; परंतु त्यासाठी जी नीतिमत्ता लागते ती या महायुती सरकारमध्ये आहे का? हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली; परंतु त्यांच्या खात्यामध्ये खरोखर तुम्ही पैसे टाकणार का? जनतेला मोफत सिलेंडरचं आमिष तुम्ही दाखवलं; परंतु सिलेंडरचे भाव गगनाला भिडले त्याचं काय? शेतकऱ्यांसाठी सरसकट दोन लाख कर्जमाफी करणार होता, ते तुम्ही करू शकला नाही. पण केंद्रात आम्ही केलं होतं, असं मत अतुल लोंढे यांनी मांडलं.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डबघाईला:काँग्रेसने जे जे आश्वासन दिलं किंवा राहुल गांधींनी जे जे सांगितलं त्याची पूर्तता काँग्रेसनं केली आहे; मात्र नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कधीच झाली नाही. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. दरडोई उत्पन्न कमी झालेलं आहे. राजस्थानमध्ये २५ लाखाची चिरंजीवी आरोग्य योजना हे भाजपाचं सरकार आल्यानंतर बंद पाडली. २०१२ च्या जनगणने प्रमाणे हे सुरू आहे. पण २०२१ ची जनगणना आल्यानंतर काय परिस्थिती होईल हासुद्धा मोठा प्रश्न आहे, असंही अतुल लोंढे म्हणाले.