महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोकणातील चाकरमान्यांना गणपती 'बाप्पा पावला'; राज्य सरकारनं केली मोठी घोषणा - Ganeshotsav 2024

Ganeshotsav 2024 : गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उद्या 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत राज्य सरकारच्या वतीनं सर्व गणेशभक्तांना टोलमाफ असणार आहे. मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-बेंगळुरू महामार्ग इतर सर्व टोलनाक्यांवर गणेशभक्तांना टोलमाफी असेल.

Ganeshotsav 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2024, 9:03 PM IST

मुंबई Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवासाठी मुंबईतून मोठ्या संख्येनं गणेशभक्त कोकणात जातात. या गणेशभक्तांसाठी राज्य सरकारनं खूशखबर दिलीय. गुरुवार 5 सप्टेंबर 2024 ते 19 सप्टेंबर 2024 या कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला. मुंबई-बंगळुरु, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसंच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल माफ करण्याचे निर्देश सरकारनं दिले.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी 14 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागानं टोलमाफीचा निर्णय जारी केला.

असा मिळेल लाभ :टोलमाफी सवलतीसाठी भाविकांना आपल्या वाहनावर "गणेशोत्सव 2024, कोकण दर्शन" अशा आशयाचा स्टीकर्स स्वरुपाचा टोलमाफी पास त्यावर गाडी क्रमांक, चालकाचं नाव असा मजकूर लिहून तो स्टीकर्स चिटकावा लागेल. आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस चौक्या आणि आर.टी.ओ. ऑफिसेसमध्ये हे स्टीकर्स मिळतील. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे.

बसेसनाही टोलमाफ : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसनाही टोलमाफी लागू असणार आहे. गणेशोत्सवासाठी ज्या जिल्ह्यातून बसेस येतील त्या ठिकाणच्या पोलीस किंवा आरटीओ यांच्याकडून हे पास एसटी महामंडळाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पोलीस आणि परिवहन विभागानं गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या देखील सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा

  1. तिवसा येथे महिला स्पेशल बैलपोळा; शेतकरी महिलांनी सजवून आणल्या बैलजोड्या, पाहा व्हिडिओ... - Women Special bullfestival
  2. साताऱ्यात बेमुदत आंदोलनामुळं लालपरीची चाकं थांबली, एसटी कर्मचाऱ्यांनी गुणरत्न सदावर्तेच्या वक्तव्याचा केला निषेध - ST Employees Strike
  3. एसटी संपाचा फटका कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना; सरकारनं केली 'ही' सोय - ST Employees Strike

ABOUT THE AUTHOR

...view details