शिर्डी (अहमदनगर) Wedding and voting: नाशिक शिक्षक मतदार संघात आज लोकशाहीचा उत्सव पार पडला.आज विवाह समारंभाचीही मोठी तिथी होती. त्यामुळं कोपरगाव येथे अपर्णा अर्जुन औताडे या नववधुनं सकाळी लग्नाच्या एक तास अगोदर मतदानाचा हक्क बजावला. बोहल्यावर चढण्यापूर्वी या नवरीनं "आधी लगीन लोकशाहीचं" म्हणत मतदानाचं कर्तव्य बजावलं आहे. तिचा शुभविवाह आज कोपरगाव येथील बेट शुक्राचार्य मंदिरात दुपारी साडेबाराच्या मुहूर्तावर पार पडला.
बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरीनी केले मतदान (ETV BHARAT Reporter) लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा : मंडपात जाण्यापूर्वी नवरी मतदान केंद्रावर पोहचली होती. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदारानं मतदान करण्याचं आवाहन या नवरीनं केलं. या नवरीनं विवाहाच्या कार्यक्रमाचं नियोजन बाजूनं ठेवून आधी मतदान करण्याचा निर्णय घेतल्यानं, नागरिकांनी तिचं स्वागत केलं.
एक मत मोलाचं : लग्नसराई देखील सुरू आहे. मात्र लग्नाच्या घाईत नवरी आवर्जुन मतदानासाठी केंद्रावर हजर राहिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना अर्पणा औताडे म्हणाली की, ती पोहेगाव ग्रामपंचायतची सदस्य आहे. एका मताचं महत्त्व काय असतं हे तिला माहिती आहे. त्यासाठी ती प्रचारात वणवण फिरली आहे. त्यामुळं एक मत किती मोलाचं आहे हे माहीत आहे. म्हणूनच मी आज या ठिकाणी मतदानाला आल्याचं अपर्णा सांगते.
बोहल्यावर चढण्यापूर्वी केलं मतदान :देशातील प्रत्येक नागरिकानं आपला मतदानाचा हक्क बजावणं गरजेचं आहे. देशात लोकशाही बळकट करायची असेल तर प्रत्येकानं घराबाहेर पडावं आणि मतदान करावं असा संदेश वारंवार अनेकांकडून दिला जातो. दरम्यान आज बोहल्यावर चढण्यापूर्वी कोपरगाव मतदान केंद्रावर चक्क नवरी लग्नाची पैठणी नेसून पोहोचली आणि उपस्थितांना अचंबित केलं.
टाळ्यांच्या गजरात नवरीचं स्वागत: नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी नवरी केंद्रावर पोहोचली. कोपरगावात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. बोहल्यावर चढायच्या आधी अर्पणा औताडेनं पोहेगाव येथील आत्मा मलिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला. केंद्रात जाऊन लोकशाही बळकट होण्याच्या दृष्टीनं मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी आलेल्यांनी टाळ्यांच्या गजरात नवरीचं स्वागत केलं.
हेही वाचा -
- नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत उत्स्फूर्त प्रतिसाद; 21 उमेदवार रिंगणात... - Nashik Teacher constituency
- नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं कारखान्यावर टाकली धाड; धाडसत्रानंतर विवेक कोल्हेंची प्रतिक्रिया - Vivek Kolhe
- शिक्षक मतदारसंघात तिरंगी लढत: कोल्हेंच्या संस्थांवर सरकारी यंत्रणेची छापेमारी; कारण गुलदस्त्यात - Teacher Constituency Election 2024