महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांचे निधन - Anita Goyal passes away - ANITA GOYAL PASSES AWAY

Anita Goyal passes away - अनिता गोयल यांचं निधन झालं आहे. त्या जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी होत्या. मुंबईत एका खासगी रुग्णालयात आज त्यांचं निधन झालं.

जेट एअरवेज
जेट एअरवेज (File photo)

By PTI

Published : May 16, 2024, 7:37 PM IST

मुंबईAnita Goyal passes away- जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांचं आज गुरुवारी निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपासून आजारी असल्याने शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. तिथेच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्या पश्चात पती नरेश आणि दोन मुले, मुलगी नम्रता आणि मुलगा निवान गोयल असा परिवार आहे.

मरीन लाइन्स परिसरातील चंदनवाडी स्मशानभूमीत दुपारी दोनच्या सुमारास अनिता यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जेट एअरवेजच्या काही माजी कर्मचाऱ्यांसह उद्योगपती अनिल अंबानी, बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी आणि त्यांचे गीतकार पती जावेद अख्तर यांच्यासह कुटुंबातील सदस्य आणि मित्र स्मशानभूमीत उपस्थित होते, असं सूत्रांनी सांगितलं. अनिता यांनी नॉन-एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट आणि जेटच्या बोर्ड मेंबर म्हणून काम केलं होतं. 25 वर्षानंतर तीव्र आर्थिक संकटामुळं एप्रिल 2019 मध्ये जेट एअरवेज ही कंपनी ग्राउंड करण्यात आली होती. ही कंपनी कार्यरत असताना त्या एअरलाइनमध्ये महसूल व्यवस्थापन आणि नेटवर्क नियोजन या प्रमुख क्षेत्रांची जबाबदारी सांभाळत होत्या. अनिता गोयल यांच्याबरोबर काम केलेल्या एका माजी कर्मचाऱ्यानं पीटीआयला त्यांच्याबाबतची माहिती दिली.


अनिता या जेट एअरवेजच्या दैनंदिन कामकाजात पूर्णपणे गुंतलेल्या होत्या. अनिता त्यांच्या उपाध्यक्षपदाच्या भूमिकेचा एक भाग म्हणून विमान निर्माते, बोईंग आणि एअरबसच्या प्रतिनिधींसोबत बैठकाही घेत असत, असंही या कर्मचाऱ्यानं सांगितलं. अनिता गोयल 25 मार्च 2019 रोजी एअरलाइनमधील त्यांच्या संबंधित पदावरून पायउतार झाल्या. 2023 मध्ये, अनिता आणि नरेश गोयल या दोघांनाही अंमलबजावणी संचालनालयाने नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी म्हणून नाव देण्यात आलं. नरेश गोयल, एकेकाळी हाय-फ्लाइंग टायकून म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना अटक करण्यात आली होती, आणि सध्या वैद्यकीय कारणास्तव ते अंतरिम जामिनावर आहेत. मात्र अनिता यांना कधीही अटक करण्यात आली नाही.

जेट एअरवेज दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेतून जात आहे. मात्र या प्रक्रियेमध्ये काही अडचणी येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं कायदेशीर अडचणींचा समावेश आहे. त्यामुळे व्यवहार पूर्ण होत नाही.

हेही वाचा..

  1. कोल्हापूरच्या अनेक गावात सव्वाशे वर्ष सुरू आहे 'ही' प्रथा, गावागावात का ओढला जातो 'मरीआईचा गाडा' - Kolhapur Village Tradition
  2. कोहलीनं निवृत्तीबाबत एकदाचं सांगून टाकलं, क्रिक्रेटप्रेमी पडले चिंतेत! - IPL 2024
  3. मुंबईत धार्मिक कार्यक्रमात भाजपाच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन भोवलं; आयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल - lok sabha election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details