महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आदिवासी कुपोषित महिलांच्या जीवनात बदल घडवणार, अमृता फडणवीस यांचा निर्धार - Amruta Fadnavis - AMRUTA FADNAVIS

Health Checkup Camp Palghar : पालघरमध्ये आज (5 मे) शिशू आणि माता संगोपन केंद्राचे भूमिपूजन अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदिवासी कुपोषित महिलांच्या जीवनात बदल घडवणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Health Checkup Camp Palghar
माता संगोपन केंद्राच्या भूमिपूजन प्रसंगी अमृता फडणवीस यांचा सन्मान करताना पदाधिकारी (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 8:10 PM IST

आदिवासी मातांचे आरोग्य सुदृढ व्हावे याविषयी मार्गदर्शन करताना अमृता फडणवीस (Reporter)

पालघरHealth Checkup Camp Palghar: पालघर येथील दिव्यांग माता, शिशू, माता संगोपन केंद्राचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. यावेळी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. दिव्यज फाउंडेशनच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाला श्रमजीवी संघटनेचे प्रमुख विवेक पंडित, कॅप्टन विनीत मुकणे तसेच अन्य अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी स्वातंत्र्यदूत पुरस्काराचे वितरण करण्यात आले.


स्वातंत्र्य कशा, कशाचे हवे? :फडणवीस म्हणाल्या, की आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असले, तरी अजूनही अनेक स्वातंत्र्याची आपल्याला आवश्यकता आहे. आपल्याला स्वातंत्र्य कशासाठी हवे, कशापासून हवे, याचा विचार करायला हवा. आपल्याला कुपोषणापासून स्वतंत्र हवे. आपल्या आपल्याला मूलभूत अधिकार मिळण्याचे स्वातंत्र्य हवे. पाणी मिळण्याचे स्वातंत्र्य हवे.


कुपोषित महिलांसाठी माहेरघर :दिव्यज फाउंडेशनच्यावतीने आता पालघर जिल्ह्यात एक माहेरघर तयार झाले आहे. कुणाच्याही जीवनात कठीण प्रसंग आले, तर येथे येऊन त्यांना आधार घेता येईल. कुपोषित महिलांना इथे आल्यानंतर व्यवस्थित उपचार, आहार आणि कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाईल. महिलांचा आत्मसन्मान वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी खात्री त्यांनी दिली.


येथील उत्पादनांना जगभर बाजारपेठ :वाडा, पालघर, जव्हार, विक्रमगड आदी भागात नागली, हातसडीचे तांदूळ तयार होतात. येथील कला जगभर पोचली आहे. आता जगात तृणधान्याला जास्त महत्त्व आहे. नागली, नाचणी, हातसडीचा तांदूळ निर्यात करून जगाची बाजारपेठ मिळवण्याची संधी आपल्याला आहे. त्यातून या भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे शक्य आहे, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.


महिलांच्या आयुष्यात बदल आणि आर्थिक स्थैर्य आणणार :विवेक पंडित यांनी स्त्रियांना पाण्यासाठी उभे राहण्याचे बळ दिले. खरे तर केंद्र आणि राज्य सरकार महिलांच्या पाण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविते. अधिकाऱ्यांनी या योजना चांगल्या पद्धतीने राबवून महिलांना पाण्याचा अधिकार दिला पाहिजे. सर्वांचा पाठिंबा असेल तर आपण येथे बदल करू शकतो. पालघर, जव्हार अशा पाठिंबाच्या जोरावर पुढे जाईल. आदिवासी महिला, बालकांच्या आयुष्यात बदल घडविण्याचे काम दिव्यज फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे. आता या सर्वांच्या जीवनशैलीत सुधारणा करण्यावर भर आहे. आपली उत्पादने आपण देश, विदेशात नेऊन आपले आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन अमृता फडणवीस यांनी केले.

हेही वाचा :

  1. कांद्यावरील निर्यातबंदी हटवली खरी पण जबर निर्यात शुल्क लागू, महायुतीच्या उमेदवारांना होणार का फायदा? - onion exports
  2. अजित पवार गटाच्या बड्या नेत्याचा परिचारिकेवर बलात्कार; पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न - Palghar Crime
  3. कांद्यावरील निर्यातबंदी हटवण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार - Devendra Fadnavis On Onion Exports

ABOUT THE AUTHOR

...view details