मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं विधानसभा निवडणूक 2024 चं रणशिंग फुंकलं आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या 27 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, राजलक्ष्मी भोसले, सुरेखा ठाकरे, यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावरही स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी टाकण्यात आली आहे.
विधानसभा निवडणूक 2024 : राष्ट्रवादीच्या 27 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, सयाजी शिंदे, रुपाली चाकणकरांसह 'या' नेत्यांचा आहे समावेश
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 27 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यादीत अभिनेते सयाजी शिंदे, रुपाली चाकणकर आदींसह दिग्गज नेत्यांच्या समावेश आहे.
Published : Oct 22, 2024, 7:46 AM IST
|Updated : Oct 22, 2024, 10:05 AM IST
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे आहेत स्टार प्रचारक :खासदार सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महिला व बाल विकासमंत्री अदिती तटकरे, खासदार नितीन पाटील, सयाजी शिंदे, आमदार अमोल मिटकरी, अल्पसंख्याक नेते जल्लाउद्दीन सैय्यद, युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार इद्रीस नायकवडी, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, महेश शिंदे, राजलक्ष्मी भोसले, सुरेखा ठाकरे, उदयकुमार आहेर, शशिकांत तरंगे, वासिम बुर्हाण, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे आदींचा समावेश आहे.
हेही वाचा :