महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना; नवी मुंबई महापालिका मुख्यालयात वॉर रुम - cm ladki bahin yojana - CM LADKI BAHIN YOJANA

cm ladki bahin yojana 'माझी लाडकी बहीण’ योजनेपासून मुंबई महानगरपालिका हद्दीतील एकही महिला वंचित राहू नये म्हणून प्रशासनाकडून पावलं उचलली जात आहेत. याकरिता 111 प्रभागांमध्ये अंगणवाडी केंद्रासह एकूण 329 ठिकाणाहून अर्ज भरण्यात येत आहेत. तसंच 02 ठिकाणी वॉर रुम तयार करण्यात आले आहे.

cm ladki bahin yojana
माझी लाडकी बहीण (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 1:25 PM IST

नवी मुंबई cm ladki bahin yojana: माझी लाडकी बहीण’ योजनेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकही पात्र महिला वंचित राहू नये. याकरिता नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय स्तरापर्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आलं आहे. याकरिता दोन वॉर रूम तयार करण्यात आल्या आहेत. याची आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार आणि समाज विकास विभागाचे उपआयुक्त तथा योजनेचे नोडल अधिकारी ‍किसनराव पलांडे आणि सहा. नोडल अधिकारी प्रबोधन मवाडे यांच्यासह भेट देत कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसंच कामाला नियोजनबध्द गती देण्याचे आदेश केले आहे.

46 हजार 629 अर्ज प्राप्त: 31 जुलै पर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेने 111 प्रभागांमध्ये स्थापन केलेल्या अंगणवाडी केंद्रासह एकुण 329 ठिकाणांहून ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचे ऑनलाईन 27,046 आणि ऑफलाईन 21,583 असे एकूण 46,629 अर्ज प्राप्त झालेले आहेत. आलेल्या अर्जांची पडताळणी वार्डस्तरीय समितीमार्फत करण्यात येत आहे. या संदर्भात आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार उपआयुक्त, समाजविकास किसनराव पलांडे यांनी सर्व विभागांचे सहा. आयुक्त यांची ऑनलाईन बैठक घेऊन तांत्रिक अडचणींबाबतच्या शंकांचे निरसन केले. महानगरपालिका मुख्यालयामध्ये 02 ठिकाणी वॉर रुमची स्थापना करण्यात आलेली असून 40 कर्मचा-यांची 2 सत्रात नेमणूक करण्यात आलेली आहे. याकरिता सकाळी 8 ते दुपारी 3 तसेच दुपारी 3 ते रात्री 10 अशा 2 सत्रात छाननीचं काम सुरू करण्यात आलेलं आहे.

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी:‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करिता महानगरपालिका क्षेत्रामध्ये बॅनर, पोस्टर, होर्डींग, हँडबिल तसंच सोशल मिडीया आणि वर्तमानपत्रे अशा विविध माध्यमांतून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. समुह संघटक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या मार्फतही महिला बचत गट आणि महिलांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन योजनेची माहिती दिली जात आहे. अर्ज भरुन घेतले जात आहे. ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेमधील पात्र महिलांना लवकरात लवकर लाभ मिळावा याकरिता आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार अर्ज भरुन घेणे तसंच पोर्टलवर दाखल अर्जांची छाननी करणे या दोन्ही कामांना समांतर गती दिलेली आहे. तरी ज्या पात्र महिलांनी अद्याप अर्ज दाखल केलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून दरमहिना 1500रुपये इतक्या रक्कमेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आयुक्त कैलास शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

हेही वाचा

  1. लाडक्या बहिणींना विरोध करणारे सावत्र भाऊ- मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर सोडला बाण - Eknath Shinde Attack On Thackeray
  2. "लाडकी बहीण, भाऊनंतर आता 'लाडका पूरग्रस्त' विसरू नये"; आमदार सतेज पाटलांचा राज्य सरकारला चिमटा - Majhi Ladki Bahin Yojana

ABOUT THE AUTHOR

...view details