महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोठ्या पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवत बेकायदेशीररित्या दुसऱ्या देशात पाठवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश - high paying jobs

मुंबईमधून आंतरराज्य मानवी तस्करी (human trafficking) करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेनं पर्दाफाश केला आहे. परदेशात नोकरीचं आमिष दाखवून फसवलं जात होतं.

gang busted for illegally
अवैधरित्या काम करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 26, 2024, 9:40 PM IST

मुंबई : परदेशात नोकरीचं स्वप्न दाखवून भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधून आंतरराज्य मानवी तस्करी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या कक्ष 8 कडून पर्दाफाश करण्यात आलाय. (high paying jobs) बेरोजगार तरुणांना परदेशातील मोठा पगार असलेल्या नोकरीचं आमिष दाखवून तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून बेकायदेशीर कामं करून घेत असल्याबाबत तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. याप्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात (दि. 23 मार्च)ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास कक्ष 8 कडून केला जात असताना या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली.

परदेशात पलायन करण्याचा प्रयत्न : बेरोजगार तरुणांना परदेशात चांगल्या पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवून तरुणांकडून बेकायदेशीर कामं करून घेतल्याप्रकरणी आलेल्या तक्रारीवरून विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्हाच्या तपासादरम्यान आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी टोळीचा प्रमुख आणि त्यांचा मुख्य साथीदार मुंबईत असल्याची खात्रीलायक गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष 8 ला मिळाली. (Interna human trafficking) त्या माहितीच्या आधारे प्राथमिक पडताळणी केल्यानंतर तपासासाठी कक्ष 8 चे पोलीस पथक गेलं. मात्र, आरोपींनी तपास यंत्रणांना चकवा देत परदेशात पलायन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सापळा रचून पोलिसांनी त्यांना अटक केली.

भारतात परत जाण्यासाठी खंडणी : अटक आरोपींची नावं जेरी फिलिप्स जेकब (वय 46) आणि गॉडफ्री थॉमस अल्वारेस (वय 39)अशी आहेत. या दोन्ही आरोपींनी संपूर्ण भारतातील विविध शहरातील गरजू तरुणांना परदेशात चांगल्या पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवून प्रत्यक्षात त्यांना इतर देशांमध्ये विनापरवाना प्रवेश करावायास लावून त्यांच्याकडून फसवणुकीची बेकायदेशीर कृत्य करून घेतली गेली आणि विरोध करणाऱ्या तरुणांना भारतात परत जाण्यासाठी खंडणी उकळण्यात आल्याचं निष्पन्न झालं आहे.

गुन्हा दाखल : यातील काही प्रकरणात तरुणांनी स्वतःची सुटका करून घेत भारतात परतल्याचं निदर्शनास आलं आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष 8 यांच्याकडून बळी ते समानची ओळख पटवून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती कक्ष 8 चे प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details