महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रॉपर्टी टॅक्सचा ग्राहकांनी पालिकेला टाकला मोठा 'बाऊन्सर'; तब्बल 892 चेक बाऊन्स, 38 जणांविरोधात खटला दाखल - BMC Property Tax - BMC PROPERTY TAX

BMC Property Tax : 2022-23 या आर्थिक वर्षात महानगरपालिकेचे 892 प्रॉपर्टी टॅक्सचे चेक बाऊन्स झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणांवर आता पालिकेनं कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

892 checks bounced by Mumbai Municipal Corporation of property tax court case filed against 38 people
प्रॉपर्टी टॅक्सचे पालिकेला आलेले तब्बल 892 चेक बाऊन्स, 38 जणांविरोधात न्यायालयीन खटला दाखल

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 4, 2024, 9:54 PM IST

मुंबई BMC Property Tax : फेब्रुवारी महिन्यात तब्बल 60 हजार कोटींचा अर्थसंकल्प बृहन्मुंबई महानगरपालिकेनं सादर केला. या अर्थसंकल्पात महानगरपालिकेनं विविध प्रकल्पांच्या घोषणा केल्या खऱ्या, मात्र पालिकेच्या तिजोरीत सध्या खडखडाट असल्याचं चित्र आहे. पालिकेनं मागच्या काही वर्षात कोणत्याही टॅक्समध्ये वाढ केलेली नाही. त्यामुळं उत्पन्नात वाढ नसताना खर्चात मात्र वाढ झाल्याचं चित्र आहे. यावर उपाय म्हणून सध्या पालिका प्रशासनानं प्रॉपर्टी टॅक्स वसुलीवर भर दिला आहे. अधिकाधिक वसुली व्हावी यासाठी पालिकेनं आता जुन्या प्रकरणांमध्ये देखील कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात पालिकेचे तब्बल 892 प्रॉपर्टी टॅक्सचे चेक बाऊन्स झाले होते. या प्रकरणांवर पालिकेनं आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 31 मार्चला 2023-24 या आर्थिक वर्षाच्या शेवट झाला. या आर्थिक वर्षात पालिकेनं तब्बल 3 हजार 196 कोटी रुपयांची वसूली केली.



पालिकेनं काय म्हटलंय? : याबाबत पालिकेनं म्हटलंय की, मालमत्ता कराचा भरणा करण्यात दिरंगाई करणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेच्या वतीनं थेट कारवाई करण्यात येत आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये करभरणा करताना मालमत्ताधारकांनी जमा केलेल्या धनादेशांच्या एकूण 892 अनादर प्रकरणांपैकी 853 प्रकरणांमध्ये महानगरपालिकेकडून 37 कोटी 83 लाख रुपयांची वसूली करण्यात आली आहे. तर, उर्वरित 38 मालमत्ताधारकांविरोधात निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट ॲक्ट 1881 अनुसार, न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.

मालमत्ता करभरणा करणे मालमत्ताधारकांना सोईचे जावे, यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये रोखीने देयक जमा करण्यासोबतच धनादेश, डिमांड ड्राफ्ट, ऑनलाईन पद्धतीनेही कर भरता येणे शक्य आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये धनादेशाद्वारा करभरणा केलेल्या 892 प्रकरणात प्रत्यक्षात धनादेशांचा अनादर झाल्याचं आढळून आलं. यात एकूण 43 कोटी 54 लाख रुपयांचा मालमत्ता कर अपेक्षित होता.

38 जणांविरोधात न्यायालयीन खटला दाखल : धनादेशाचा अनादर झाल्यानं या 892 मालमत्ता धारकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 नुसार नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर यापैकी 853 मालमत्ता धारकांनी त्यांच्याकडील एकूण 37 कोटी 83 लाख रुपयांचा करभरणा केला. मात्र, नोटीस बजावल्यानंतरही करभरणा करण्यात कुचराई करणाऱ्या उर्वरित 38 मालमत्ताधारकांविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे एकूण 5 कोटी 71 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे.


3 एप्रिल 2024 रोजी कर भरण्यासाठी पाठपुरावा केलेल्या ‘टॉप टेन’ मालमत्ता करधारकांची यादी पालिकेनं जाहीर केली असून ही यादी खालीलप्रमाणे आहे.



1) रजनीकांत देविदास श्रॉफ ( डी विभाग) – 43 कोटी 11 लाख 1 हजार 988 रुपये

2) एस. जी. जैन आणि सी. बी. जैन (एम पश्चिम विभाग) – 5 कोटी 44 लाख 6 हजार 479 रुपये

3) सृष्टीराज डेव्हलपर्स (के पूर्व विभाग) – 4 कोटी 71 लाख 97 हजार 274 रुपये

4) उषा मधू डेव्हलपमेंट (पी दक्षिण विभाग) – 4 कोटी 38 लाख 44 हजार 476 रुपये

5) टॉपवर्थ प्रॉपटीज प्रा. लि (जी दक्षिण विभाग) – 4 कोटी 37 लाख 99 हजार 212 रुपये

6) अलमगीर अली मोहम्मद मलकानी आणि अन्य (पी उत्तर विभाग)– 4 कोटी 32 लाख 42 हजार 266 रुपये

7) गूडबिल्ट इंडिया प्रा. लि (पी दक्षिण विभाग) – 3 कोटी 87 लाख 56 हजार 339 रुपये

8) जयश्री बिल्डर्स (एस विभाग) – 3 कोटी 81 लाख 95 हजार 125 रुपये

9) सहयोग होम्स लिमिटेड (के पश्चिम विभाग) – 3 कोटी 75 लाख 69 हजार 864 रुपये

10) सत्यभामा एन आचार्य (एम पश्चिम विभाग) – 2 कोटी 59 लाख 41 हजार 746 रुपये

हेही वाचा -

  1. BMC Property Tax Collection : मुंबई महापालिकेचे मिशन मालमत्ता करवसुली फेल, 3 हजार 196 कोटी रुपयांचे कर संकलन - BMC Property Tax Collection mission
  2. मुंबईत विकास प्रकल्पासाठी सहा वर्षांत तब्बल 21,028 झाडांची कत्तल; 'झाडे लावा झाडे जगवा' चा नारा केवळ कागदा पुरताच? - BMC
  3. राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; BMC अतिरिक्त आयुक्तपदी अभिजीत बांगर, तर अश्विनी भिडेंची 'या' जागेवर झाली बदली

ABOUT THE AUTHOR

...view details