बीड Dnyanradha Multistate Bank: बीडची ज्ञानराधा मल्टीस्टेट ही राज्यात एकूण 52 शाखा असलेली मोठी मल्टीस्टेट पतसंस्था म्हणून ओळखली जात होती. त्यातच कुठे ग्रुप हा देखील सामील होता. अर्चना कुठे जरी त्याच्या अध्यक्ष असल्या तरी आर्थिक व्यवहार मात्र ज्ञानराधा मल्टीस्टेट मधूनच होतो.
इतक्या रुपयांची मालमत्ता जप्त :बीडच्या ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेच्या घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने सुरेश कुटे आणि त्याचा भाचा संचालक आशिष पाटोदकर यांच्या फास आणखी आवळला आहे. सुरेश कुटे, अर्चना कुटे आणि आशिष पाटोदकर यांची आतापर्यंत 5 हजार 765 कोटी 24 लाख 20 हजार रुपयांची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे. या मालमत्तेची विक्री करून त्यातून ठेवीदारांचे पैसे द्यावेत यासाठी एमपीआयडी कायद्यानुसार प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू आहे.
कोणत्या ठिकाणी झाली कार्यवाही : आर्थिक गुन्हे शाखा एमपीआयडी म्हणजेच ठेवीदार हित संरक्षण कायद्यानुसार, मालमत्तांची विक्री करून ठेवीदारांचे पैसे देण्याबाबत प्रस्ताव शासनाला पाठवणार आहे. या प्रस्तावाचं काम सुरू आहे. प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नेमून मालमत्तांचा लिलाव होत असतो. बीड येथील कुटे ग्रुपवर नोव्हेंबर 2023 मध्ये प्राप्तीकर विभागाने छापेमारी केली होती. त्यानंतर कुटे ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटे अध्यक्ष असलेल्या ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेत ठेवी मागण्यासाठी ठेवीदारांची मोठी गर्दी झाली आणि पतसंस्था आर्थिक अडचणीत आली. या प्रकरणी जिल्ह्यात 41 गुन्हे नोंद आहेत.