महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पब-जी गेम खेळण्याच्या नादात सोळा वर्षीय मुलाचा वाढदिवसाच्या मध्यरात्री तलावात पडून मृत्यू - Ambazari Lake - AMBAZARI LAKE

16 Year Old Boy Death in Ambazari Lake : पब-जी गेम खेळणं एका 16 वर्षीय मुलाच्या जीवावर बेतलय. पब-जी गेम खेळताना तलावात पडून या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नागपुरात समोर आलीय.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र (Etv Bharat MH Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 13, 2024, 5:44 PM IST

नागपूर 16 Year Old Boy Death in Ambazari Lake : वाढदिवसाच्या दिवशी पब-जी गेम खेळण्याचा नाद एका 16 वर्षीय मुलाच्या जीवावर बेतला आहे. पब-जी गेम खेळताना भान हरपलेला हा मुलगा थेट अंबाझरी तलावाच्या अगदी शेजारी असलेल्या पंपिंग स्टेशन जवळ एका खड्ड्यातत पडला, ज्यामुळं त्याचा मृत्यू झाला आहे. पुलकित शहादादपुरी (16) असं मृत झालेल्या मुलाचं नाव आहे.

पब-जी खेळताना पडला तलावात : याविषयी अधिक माहिती अशी की, पुलकित यानं रात्री आईवडिलांसोबत उत्साहात वाढदिवस साजरा केला. त्यानंतर तो पहाटेच्या सुमारास मित्रांसोबत पोहे खाण्याच्या बहाण्यानं घराबाहेर पडला. सर्व मित्र शंकर नगर चौकात पोहोचले. मात्र, त्याठिकाणी पोह्याचं दुकान सुरू नव्हतं, म्हणून सर्व अंबाझरी तलाव परिसरात फिरायला आले. त्यावेळी पुलकित पब-जी गेम खेळत खेळत अंबाझरी तलावाच्या शेजारीच असलेल्या पंपिंग स्टेशन परिसरात पोहोचला. त्याचं सर्व लक्ष मोबाईलच्या गेममध्ये असल्यानं त्याला आपण कुठं जात आहे याचंदेखील भान राहिलं नव्हतं. अंबाझरी पंपिंग स्टेशनच्या चबुतऱ्यावरुन अचानक पुलकितचा तोल गेला आणि तो थेट तलावात पडला. पुलकित खाली पडल्याचं त्याच्या मित्रांच्या लक्षात येताचं त्यांनी आरडाओरडा सुरू केला. मात्र, तोपर्यंत त्याचा बुडून मृत्यू झाला होता. पुलकितच्या मित्रांनी लगेच पुलकितच्या घरच्यांना फोन करुन सर्व प्रकार सांगितला. तसंच पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली.

पुलकितच्या कुटुंबियांना मानसिक धक्का : या घटनेनंतर पुलकितच्या आई वडिलांना जबर मानसिक धक्का बसलाय. रात्री पुलकितचा वाढदिवस सर्वांसोबत साजरा केल्यानंतर सकाळी मुलाचा मृत्यू झाल्याच्या बातमीनं शहादादपुरी कुटुंब खचून गेलं. याप्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनेक तास प्रयत्न केल्यानंतर पुलकित शहादादपुरी याचा मृतदेह पंपिंग स्टेशनच्या बाहेर काढण्यात यश आलं.


हेही वाचा :

  1. भारतीयांचे पार्थिव लवकरात लवकर मायदेशी पाठवावे-परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची कुवेतला विनंती - KUWAIT BUILDING FIRE
  2. गाझियाबादमध्ये अग्नितांडव! आगीत होरपळून दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू - 5 Death in Ghaziabad Fire
  3. हातावरील मेंदीचा रंग ओला असतानाच नवरदेवाचा पाण्यात बुडून मृत्यू; वाचवण्याच्या प्रयत्नात भावजीसह मेव्हण्यानंही गमवला जीव - Gadchiroli News

ABOUT THE AUTHOR

...view details