सेंट किट्स WI vs BAN 3rd ODI Live Streaming : वेस्ट इंडिज राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना उद्या म्हणजेच 12 डिसेंबर रोजी खेळवला जाईल. उभय संघांमधला हा सामना वॉर्नर पार्क, बॅसेटेरे, सेंट किट्स इथं भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाईल. वॉर्नर पार्कवर बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजच्या नजरा सीरिज क्लीन स्वीपकडे आहेत.
यजमान संघानं जिंकली मालिका : यजमान वेस्ट इंडिज संघानं तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी अभेद्य घेतली आहे. पहिल्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजनं बांगलादेशचा 5 विकेटनं पराभव केला. तर दुसऱ्या वनडे सामन्यात पाहुण्या संघाला वेस्ट इंडिजनं 7 विकेट्सनं पराभूत केलं. यासह वेस्ट इंडिजनं बांगलादेशविरुद्ध 10 वर्षांनी वनडे मालिका जिंकली आहे. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना जिंकून वेस्ट इंडिज संघाला बांगलादेशचा मालिकेत धुव्वा उडवायचा आहे. तर दुसरीकडं बांगलादेशचा संघ हा सामना जिंकत प्रतिष्ठा वाचवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. परिणामी दोन्ही संघांमधील रोमांचक सामना तुम्ही पाहू शकता.
बांगलादेशनं गमावली दुसरी मालिका : अलीकडेच बांगलादेशनं अफगाणिस्तानविरुद्धची मालिका 2-1 नं गमावली आहे. यानंतर आता वेस्ट इंडिजविरुद्धही त्यांना मालिका गमवावी लागली आहे. त्यामुळं हा सामना जिंकण्याचा बांगलादेश पुर्ण प्रयत्न करणार आहे. कर्णधार मेहंदी हसन मिराजनं गेल्या काही मालिकांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. मुस्तफिझूर रहमान आणि शोरीफुल इस्लाम सारख्या गोलंदाजांना अनुभव आहे. फलंदाजीत महमुदुल्लाह आणि तौहीद हृदोय यांच्याकडून खूप अपेक्षा असतील. याशिवाय जाकर अली यष्टिरक्षक म्हणूनही महत्त्वाचं योगदान देऊ शकतो.
खेळपट्टी कशी असेल : वेस्ट इंडिज आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज सेंट किट्स इथं खेळवला जाणार आहे. वॉर्नर पार्कची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी उपयुक्त ठरु शकते, परंतु वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला थोडी मदत मिळू शकते. 2018 साली वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील शेवटच्या वनडे सामन्यात एकूण 584 धावा झाल्या होत्या, परंतु या सामन्यात आणखी धावा अपेक्षित आहेत. खेळपट्टी वेगवान असेल आणि गोलंदाजांसाठी ती आव्हानात्मक असेल. या खेळपट्टीवर फलंदाजी करणं अधिक फायदेशीर ठरु शकतं. या खेळपट्टीवर, गेल्या 11 पैकी 9 वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं सामने जिंकले आहेत.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 46 वनडे सामने खेळले गेले आहेत. यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. वेस्ट इंडिजनं 23 वनडे सामने जिंकले असून बांगलादेशनं 21 वनडे सामने जिंकले आहेत. तर दोन सामन्यांचा निकाल लागला नाही. या सामन्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश तिसरा वनडे सामना कधी आणि कुठं होईल?