महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

फलंदाजीला येण्यापूर्वीचं 'अण्णा'नं इंग्लंडविरुद्ध पूर्ण केलं 'शतक'; अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय - इंग्लंडविरुद्ध 100 बळी

R Ashwin 100 Wickets Against England : भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विननं कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध गोलंदाजी करताना एक खास 'शतक' पूर्ण केलंय. विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज ठरलाय.

R Ashwin 100 Wickets Against England
R Ashwin 100 Wickets Against England

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 23, 2024, 1:14 PM IST

रांची R Ashwin 100 Wickets Against England : भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं इंग्लंडविरुद्ध कसोटीत 'बळींचं शतक' पूर्ण केलंय. अश्विननं रांची इथं खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध 100वा बळी घेत हा विक्रम केलाय. कसोटी क्रेकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध 100 बळी घेणारा अश्विन पहिलाच भारतीय गोलंदाज ठरलाय. याआधी, राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीच्या सामन्यात अश्विननं 500 कसोटी बळींचा टप्पा गाठला होता.

ऑस्ट्रेलिया विरुद्धही बळींचं शतक : 'अण्णा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्विननं इंग्लंडपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत 100 बळींचा टप्पा ओलांडलाय. अश्विननं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत आतापर्यंत 114 बळी घेतले आहेत. ही आकडेवारी पाहता अश्विन ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध कसोटीत डोकेदुखी ठरत असल्याचं दिसतंय.

कसोटीत 500 बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज :रविचंद्रन अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी घेणारा दुसराच भारतीय गोलंदाज ठरलाय. माजी दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे कसोटीत 500 बळींचा टप्पा पार करणारा पहिला भारतीय गोलंदाज आहे. अश्विननं मालिकेतील राजकोट इथल्या तिसऱ्या कसोटीत 500 बळी पूर्ण केले होते.

पहिल्या सत्रानंतर भारताची सामन्यावर पकड मजबूत : चौथ्या कसोटीत इंग्लंडनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र तो निर्णय त्यांच्यासाठी चांगला ठरला नाही. पहिल्या दिवसाचं पहिलं सत्र संपेपर्यंत इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला होता. पहिल्या सत्राअखेर इंग्लंडनं 24.1 षटकांत 5 विकेट गमावून 112 धावा केल्या होत्या. भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण कराणाऱ्या आकाश दीपनं तीन बळी घेत साहेबांची फलंदाजी उद्धवस्त केली. तसंच रवींद्र जडेजा आणि अश्विन यांनीही प्रत्येकी एक बळी घेतला.

हेही वाचा :

  1. IND vs ENG 4th Test : पदार्पणातच आकाशनं 'दीप'क चमकवल्यानंतर फिरकीच्या जाळ्यात अडकले 'इंग्रज'; लंच ब्रेकपर्यंत अर्धा संघ तंबूत
  2. रांची कसोटीसाठी साहेबांच्या 'प्लेइंग इलेव्हन'ची घोषणा; 'या' दिग्गज गोलंदाजाचं संघात पुनरागमन
  3. लोकसभेच्या रणधुमाळीत रंगणार आयपीएल, 'या' तारखेपासून होणार सुरु; 17 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार 'ही' गोष्ट

ABOUT THE AUTHOR

...view details