पर्थ Jasprit Bumrah and Pat Cummins Will Creates History : क्रिकेटच्या इतिहासातील पहिला कसोटी सामना यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात 1877 साली मेलबर्न इथं खेळला गेला. या सामन्याला 147 वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात एकापेक्षा जास्त कसोटी सामने खेळले गेले आहेत. आता भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया 22 नोव्हेंबरला पर्थमध्ये आमनेसामने येणार आहेत. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 चा पहिला सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 7.50 वाजता सुरु होईल. या सामन्यात नाणेफेक होताच क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रम होणार आहे.
जसप्रीत बुमराह असेल भारताचा कर्णधार : वास्तविक, भारतीय संघ कर्णधार रोहित शर्माशिवाय पहिल्या कसोटी सामन्यात उतरणार आहे. रोहित शर्मा सध्या भारतात असून कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. अशा स्थितीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पर्थमध्ये भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. जसप्रीत बुमराह उद्या सकाळी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्ससोबत पर्थ कसोटीत नाणेफेकीसाठी मैदानात उतरेल तेव्हा मैदानावर एक विलक्षण दृश्य दिसेल. अशा प्रकारे बुमराह आणि कमिन्स मिळून कसोटीत एक अनोखा विक्रम नोंदवतील.
कसोटी क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रम होणार : कसोटी क्रिकेटच्या इतिहासात वेगवान गोलंदाजांनी कसोटी सामन्यात दोन्ही संघांचं नेतृत्व केल्याचं क्वचितच घडलं आहे. आता हा मोठा चमत्कार पर्थमध्ये घडणार आहे, जेव्हा दोन्ही संघांचे कर्णधार वेगवान गोलंदाज असतील. जसप्रीत बुमराह आणि पॅट कमिन्स हे दोघंही वेगवान गोलंदाज आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत असं फक्त 5 वेळा घडले आहे, जेव्हा कसोटी सामन्यातील दोन्ही कर्णधार वेगवान गोलंदाज होते.