महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारताचं 44 वर्षानंतरचं स्वप्न भंगलं; हॉकीच्या उपांत्य फेरीत भारताचा जर्मनीकडून पराभव, आता स्पेनविरुद्ध होणार लढत - Paris Olympics 2024 Hockey - PARIS OLYMPICS 2024 HOCKEY

Paris Olympics 2024 Hockey : भारतीय हॉकी संघानं ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. परंतु, पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारताचा (Indian Mens Hockey Team) पराभव झाला. आता त्यांना कांस्यपदकाच्या लढतीत स्पेनविरुद्ध खेळावं लागणार आहे.

Paris Olympics 2024 Hockey
पॅरिस ऑलिम्पिक 2024 (ETV BHARAT HINDI DESK)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 7, 2024, 9:40 AM IST

पॅरिस Paris Olympics 2024 Hockey : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या पुरुष हॉकीच्या (Indian Mens Hockey Team) उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला जर्मनीकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवामुळं भारतीय संघाचं तब्बल 44 वर्षांनंतर हॉकीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचं स्वप्न भंगलं आहे. हॉकीमध्ये सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक उपांत्य फेरीमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारत आता 8 ऑगस्ट रोजी स्पेन विरुद्ध कांस्यपदकासाठी सामना खेळणार आहे.

उपांत्य फेरीमध्ये भारताकडूनकोणी केले गोल ? :उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताकडून हरमनप्रीत सिंग (7व्या मिनिटाला), सुखजित सिंग (36व्या मिनिटाला) यांनी गोल केले. जर्मनीसाठी पेइलाट गोन्झालो (18वे मिनिट), रुहर क्रिस्टोफर (27वे मिनिट) आणि मिल्टकाऊ मार्को (54वे मिनिट) यांनी गोल केले.

पहिल्या क्वार्टरमध्ये भारतानं 1-0 अशी घेतली होतीआघाडी:भारतानं जर्मनीविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्याची सुरुवात चांगली केली. भारतीय खेळाडूंनी दुसऱ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला, पण भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगचा गोल चुकला. यानंतर भारतीय संघानं आक्रमण सुरुच ठेवलं. हरमनप्रीतनं 7व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचं गोलपोस्टमध्ये रुपांतर करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. या स्कोअरसह पहिला क्वार्टर संपला.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये जर्मनीनंकेलंजोरदार पुनरागमन : खेळाच्या पहिल्या क्वार्टरपर्यंत भारत 1-0 ने पिछाडीवर पडल्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये जर्मनीनं जोरदार पुनरागमन केलं. जर्मनीचा स्टार ड्रॅग-फ्लिकर पिलाट गोन्झालोनं 18व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करुन स्कोअर 1-1 असा बरोबरीत आणला. भारतानं 23व्या मिनिटाला गोल करण्याची सुवर्णसंधी गमावली. पण, भारताच्या ललित उपाध्यायनं गोलपोस्टवर चेंडू मारला. यानंतर 27व्या मिनिटाला जर्मन खेळाडू रुहर क्रिस्टोफरनं पेनल्टी स्ट्रोकवर गोल करत हाफ टाईमला 2-1 अशी आघाडी घेतली.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतानंदाखवलाजबरदस्त खेळ: तिसऱ्या क्वार्टरच्या पहिल्या 4 मिनिटांत भारताला 2 पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण दोन्हीवेळा हरमनप्रीतचा गोल चुकला. भारतानं या काळात जर्मनीवर आपलं वर्चस्व कायम राखलं आणि 36व्या मिनिटाला आणखी एक पेनल्टी कॉर्नर जिंकला. यावेळी हरमनप्रीतनं उत्कृष्ट ग्राउंड फ्लिक केलं. सतर्क सुखजीतनं चेंडूला डिफ्लेक्ट केल्यानं चेंडू जर्मन गोलकीपर डॅनेनबर्गच्या पुढं गेला. या शानदार गोलमुळं भारतानं 2-2 अशी बरोबरी साधली.

चौथ्या क्वार्टरमधील रोमांचक सामना: चौथ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला. 46व्या मिनिटाला जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला, त्यावर विवेकनं भारताच्या अनुभवी गोलरक्षकानंतर गोललाइनवर अप्रतिम सेव्ह केला. 51व्या मिनिटाला जर्मनीला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला जो भारताचा गोलरक्षक श्रीजेशनं वाचवला. मात्र या क्वार्टरमध्ये जर्मनीनं आपला आक्रमक खेळ सुरू ठेवला. त्यानंतर 54व्या मिनिटाला जर्मनीच्या मिल्टकाऊ मार्कोनं अप्रतिम मैदानी गोल करत आपल्या संघाला सामन्यात 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. हा गोल निर्णायक ठरला आणि 3 वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन जर्मनीनं भारताचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.

हेही वाचा -

  1. पॅरिस ऑलिम्पिकचा बारावा दिवस; अविनाश साबळे पदक मिळवत रचणार इतिहास? - Paris Olympics 2024
  2. दंगल गर्ल विनेश फोगटची अंतिम फेरीत धडक, भारताचं एक पदक नक्की! - Vinesh Phogat News
  3. उपांत्य फेरीत भारत-जर्मनी यांच्यात कांटे की टक्कर, कोणता संघ मजबूत? जाणून घ्या हेड-टू-हेड आकडेवारी - Paris Olympics 2024

ABOUT THE AUTHOR

...view details