दुबई ICC Lifted Suspension of SLC : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) श्रीलंका क्रिकेट बोर्डावरील निलंबन मागं घेऊन तत्काळ निर्णय लागू केला. आयसीसीनं रविवारी हा निर्णय घेतलाय. सरकारी हस्तक्षेपामुळं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं श्रीलंकन क्रिकेट बोर्डावर बंदी घातली होती. आयसीसीच्या या निर्णयानं श्रीलंका क्रिकेटला मोठा दिलासा मिळालाय.
नोव्हेंबरमध्ये केलं होतं निलंबित : श्रीलंका क्रिकेट बोर्डाला 10 नोव्हेंबर 2023 रोजी आयसीसीचं सदस्य म्हणून त्यांच्या जबाबदाऱ्या पाडताना नियमांच उल्लंघन केल्याबद्दल निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर 21 नोव्हेंबरला आयसीसी बोर्डाची बैठक झाली. श्रीलंका द्विपक्षीय आणि आयसीसी स्पर्धांमध्ये खेळू शकेल असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सध्या खेळला जाणारा अंडर-19 विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत हलवण्यात आला. यापूर्वी हा सामना श्रीलंकेत खेळवला जाणार होता.
- समाधानानंतर आयसीसीनं उठवली बंदी : आयसीसीनं सांगितलं की, "आता ते पूर्णपणे समाधानी आहेत. त्यानंतर श्रीलंका बोर्डावरील बंदी उठवण्यात आलीय. आयसीसी बोर्ड परिस्थितीकडे लक्ष देत आहे. श्रीलंका क्रिकेट यापुढे सदस्यत्वाच्या बंधनांचे उल्लंघन करत नाही. याबद्दल समाधान आहे."