जेद्दाह (सौदी अरेबिया) IPL 2025 Mega Auction Details : IPL 2025 चा मेगा लिलावाची तारीख जाहीर झाली आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हा लिलाव सलग दुसऱ्या वर्षी भारताबाहेर होणार असल्याचं स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी दुबई इथं मिनी लिलाव आयोजित करण्यात आला होता. मात्र यावेळी मेगा लिलाव सौदी अरेबियाच्या शेजारील जेद्दाह इथं होणार आहे. BCCI नं 5 नोव्हेंबरला याची घोषणा केली. प्रत्येक वेळी प्रमाणे या वेळी देखील मेगा लिलाव 2 दिवस चालणार असून 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी आयोजित केला जाणार आहे. यावेळी लिलाव मोठा असणार आहे, कारण लिलावासाठी तब्बल 1574 खेळाडूंनी नोंदणी केली असून त्यापैकी केवळ 204 खेळाडू भाग्यवान ठरणार आहेत.
किती भारतीय, किती परदेशी खेळाडू? : BCCI नं मंगळवार 5 नोव्हेंबर रोजी मेगा लिलावाशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची माहिती जाहीर केली. IPL नं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात असं सांगण्यात आलं की, मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह इथं पूर्ण होईल. या लिलावासाठी खेळाडूंच्या नोंदणीची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर होती, ती पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बोर्डानं ही घोषणा केली. लिलावात सहभागी झालेल्या 1574 खेळाडूंपैकी 1165 भारतीय आणि 409 विदेशी खेळाडू आहेत.
कॅप्ड आणि अनकॅप्ड खेळाडूंची आकडेवारी किती? :यावेळी लिलावासाठी 1574 खेळाडूंनी आपली नावं दिली आहेत, त्यापैकी एकूण 320 कॅप्ड खेळाडू आहेत. 'कॅप्ड प्लेयर्स' असं खेळाडू आहेत जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. त्याचप्रमाणे ज्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले नाही त्यांना 'अनकॅप्ड खेळाडू' म्हणतात. यावेळी लिलावात 1224 अनकॅप्ड खेळाडू सहभागी होणार आहेत. या व्यतिरिक्त, ICC च्या असोसिएट देशांचे 30 खेळाडू देखील सहभागी होत आहेत. यात यूएई, अमेरिका, स्कॉटलंड, नेदरलँड, कॅनडा आणि इटलीचा समावेश आहे.
भारताचे किती अनकॅप्ड खेळाडू : IPL च्या प्रसिद्धीपत्रकानुसार, एकूण 48 कॅप्ड भारतीय खेळाडू लिलावात सहभागी होतील, तर एकूण 965 अनकॅप्ड भारतीय खेळाडू यात सहभागी होतील. यापैकी 152 अनकॅप्ड खेळाडू असे आहेत जे यापूर्वी IPL मध्ये खेळले आहेत. तर एकूण 272 कॅप्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू यात सहभागी होतील, तसंच 104 अनकॅप्ड आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होतील. यापैकी 3 अनकॅप्ड खेळाडू यापूर्वीही IPL चा भाग राहिले आहेत.