शारजाह AFG vs BAN 3rd ODI Live Streaming : अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 11 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. दुसऱ्या वनडेत बांगलादेशनं अफगाणिस्तानचा 68 धावांनी पराभव केला. यासह बांगलादेश संघानं मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेत अफगाणिस्तानचं नेतृत्व हशमतुल्ला शाहिदीच्या खांद्यावर आहे. तर बांगलादेशचं नेतृत्व नजमुल हुसेन शांतो करत आहेत.
दुसऱ्या वनडेत काय झालं : दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेश संघानं निर्धारित 50 षटकांत सात गडी गमावून 252 धावा केल्या. बांगलादेशकडून कर्णधार नजमुल हुसेन शांतोनं 77 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 43.3 षटकांत केवळ 184 धावांतच गारद झाला.
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड : अफगाणिस्तान आणि बांगलादेशचे संघ आतापर्यंत 18 वेळा वनडे सामने खेळले आहेत. ज्यामध्ये बांगलादेशचा वरचष्मा दिसत आहे. बांगलादेशनं 18 पैकी 11 सामने जिंकले आहेत. तर अफगाणिस्ताननं 7 सामने जिंकले आहेत. यावरुन हे स्पष्ट होतं की जेव्हा जेव्हा दोन्ही संघ एकमेकांशी भिडतात तेव्हा चुरशीचा सामना होतो. मात्र, बांगलादेशचा रेकॉर्ड चांगला असल्यानं ते अधिक मजबूत दिसत आहेत.
खेळपट्टी कशी असेल : अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना शारजाह इथं खेळवला जाणार आहे. शारजाह क्रिकेट स्टेडियममधील खेळपट्टी संथ असणं अपेक्षित आहे आणि फलंदाजांना त्यांचे शॉट खेळण्यात अडचण येऊ शकते. खेळाचे भवितव्य ठरवण्यात फिरकीपटू मोठी भूमिका बजावू शकतात. शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये 253 वनडे सामने आयोजित केले गेले आहेत, ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी 133 वेळा विजय मिळवला आहे. दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी 118 वेळा विजय मिळवला आहे. मैदानावरील पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या 223 आहे, ज्यात न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तानची 364/7 ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या आहे.
मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला वनडे सामना : 06 नोव्हेंबर (अफगाणिस्तान 92 धावांनी विजयी)
- दुसरा वनडे सामना : 09 नोव्हेंबर (बांगलादेश 68 धावांनी विजयी)
- तिसरा वनडे सामना : आज
अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील तिसरा वनडे सामना कधी खेळवला जाईल?