लखनऊ Abhimanyu Easwaran Century : इराणी ट्रॉफीमध्ये मुंबईचा फलंदाज सर्फराज खानच्या द्विशतकानंतर आता 'रेस्ट ऑफ इंडिया'चा सलामीवीर अभिमन्यू ईश्वरननं अप्रतिम फलंदाजी केली आहे. ईश्वरननं मुंबईविरुद्ध अवघ्या 117 चेंडूत शतक झळकावलं, या खेळाडूनं एक षटकार आणि 8 चौकार लगावले. 'रेस्ट ऑफ इंडिया'ची सुरुवात खूपच खराब झाली. कर्णधार रुतुराज गायकवाड केवळ 9 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. साई सुदर्शनलाही केवळ 32 धावा करता आल्या आणि पडिक्कलनं 16 धावा केल्या पण ईश्वरननं एक बाजूनं संयमी खेळी करत आपलं शतक पूर्ण केलं.
ईश्वरनला अद्याप भारतीय संघात संधी नाही : अभिमन्यू ईश्वरननंही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या आहेत. परंतु या खेळाडूला अद्याप कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. ईश्वरनला निश्चितपणे कसोटी संघात अनेकवेळा स्थान मिळालं पण तो प्लेइंग इलेव्हनमध्ये पोहोचू शकला नाही. बरं, ईश्वरन यामुळं निराश नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फलंदाजी करुन हा खेळाडू सातत्यानं निवडीचे दार ठोठावत आहे. ईश्वरननं इराणी ट्रॉफीमध्ये शतक झळकावताना प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 26 वं शतक पूर्ण केलं. त्यानं या सामन्यात 212 चेंडूत नाबाद 151 धावा केल्या आहेत.