मेष (Aries) : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. असं असलं तरी आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यास आपणास त्रास होऊ शकतो. नुकसान होण्याची संभावना असल्याने व्यापाऱ्यांनी कोणतीही नवीन आर्थिक गुंतवणूक करू नये. ज्यांना नोकरी बदलावयाची आहे, त्यांनी ह्या आठवड्यात ती बदलू नये. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावेल. आपल्या अहंकारामुळं प्रेमिकेशी आपला वाद संभवतो. विवाहितांचा सुद्धा जोडीदाराशी वाद संभवतो. ज्यांना घर किंवा जमीन घेण्याची इच्छा आहे, त्यांनी ह्या आठवड्यात आपला निर्णय लांबणीवर टाकावा.
वृषभ (Taurus) : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य आहे. ह्या आठवड्यात खाण्या-पिण्यातील निष्काळजीपणामुळं पोटाशी संबंधित त्रास होण्याची संभावना असल्यानं आपणास आपल्या पोटाची विशेष काळजी घ्यावी लागेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. त्यांना आपली ओळख निर्माण करण्याची संधी मिळेल. तसेच केलेल्या परिश्रमाचे फायदे सुद्धा मिळतील. व्यापार आणि कारकिर्दीत यशस्वी होण्यासाठी आपणास परिश्रम वाढवावं लागतील. ह्या आठवड्यात कोणताही मोठा आणि महत्वाचा निर्णय घेणं टाळावं. ह्या आठवड्यात आपणास पैसा प्राप्त करण्यासाठी नवीन मार्ग मिळाल्याने आपण खुश व्हाल. ज्या विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन अध्ययन करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. आपल्या अहंकारामुळं प्रणयी जीवनात दुरावा निर्माण होऊ शकतो. वैवाहिक जीवनातील माधुर्य टिकून राहील. आपण जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घेऊ शकाल. ह्या आठवड्यात आपण एखाद्या महत्वाच्या विषयावर जोडीदाराशी चर्चा करू शकाल. असं केल्यानं आपसातील गैरसमज दूर होऊन नाते अधिक दृढ होऊ शकेल.
मिथुन (Gemini) : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. ह्या आठवड्यात आपण एखादे नवीन वाहन खरेदी करू शकता. व्यापार आणि कारकिर्दीसाठी हा आठवडा अनुकूल आहे. नोकरी करणाऱ्यांना नव्याने प्रगतीची संधी मिळू शकते. असं असलं तरी वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता सुद्धा आहे, तेव्हा सावध राहावं. ह्या आठवड्यात अपेक्षित परिणाम मिळविण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी आपणास जास्त परिश्रम करावे लागतील. ह्या आठवड्यात आपल्या एखाद्या जवळच्या मैत्रिणीकडं आपण आकर्षित होण्याची शक्यता आहे. मात्र तिचा प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमीच आहे. ह्या आठवड्यात वैवाहिक जीवनातील जुनी कटुता संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळं संबंधात हळू हळू माधुर्य वाढू लागेल. ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे, त्यांनी काम करताना अधून-मधून थोडी विश्रांती घ्यावी.
कर्क (Cancer): हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. ह्या आठवड्यात आपण तंदुरुस्त राहणार असलात तरीही निरोगी आयुष्य जगण्यासाठी आपल्या दिनचर्येत योगासन आणि सकाळी चालावयास जाण्यास प्राधान्य द्यावं. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. त्यांच्या नवीन ओळखी होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना जर नोकरी बदलावयाची असेल तर त्यासाठी आठवडा अनुकूल आहे. ह्या आठवड्यात घराचे नूतनीकरण करण्यासाठी व बाहेर फिरावयास जाण्यासाठी आपण भरपूर पैसे खर्च करू शकता. विद्यार्थ्यांसाठी आठवडा यशदायी आहे. त्यांना अपेक्षित परिणाम मिळू शकतील. आपण जर आपल्या रागावर नियंत्रण ठेवलं तर आपले प्रणयी जीवन सुखद होऊ शकेल. अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो. वैवाहिक जीवनात एखादी जुनी गोष्ट समस्या निर्माण करू शकते. परंतु आपण सामंजस्याने हि समस्या दूर करण्यास सक्षम आहात हि एक जमेची बाजू आहे.
सिंह (Leo) : या आठवड्यात आपणास थोडं सावध राहावं लागेल. ह्या आठवड्यात आपला एखादा जुनाट विकार पुन्हा उफाळून येण्याची संभावना आहे. त्याकडं दुर्लक्ष केल्यामुळं आपलं दुखणं वाढू शकतं. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना संवाद साधताना जागरूक राहावं लागेल, अन्यथा त्यांचा वरिष्ठांशी वाद होऊ शकतो. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. एखादी नवीन व मोठी ऑर्डर त्यांना मिळण्याची संभावना आहे. प्रेमीजनांना अत्यंत सावध राहावं लागेल. एखाद्या लहानशा चुकीमुळं नात्यात दुरावा येऊ शकतो. वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी मेहनत करावी लागेल. ह्या आठवड्यात कुटुंबातील कनिष्ठांशी नीट वागावं लागेल. त्यांच्याशी आपले संबंध मधुर होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
कन्या (Virgo) : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य आहे. ह्या आठवड्यात आपले जुनाट विकार पुन्हा उफाळून येण्याची संभावना आहे. अशावेळी सकाळचे फिरणे आणि योगासन करण्यावर अधिक भर द्यावा. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा काहीसा त्रासदायी आहे. व्यापाऱ्यांना प्राप्तीत वाढ करण्यासाठी नवीन मार्ग मिळू शकेल. हा आठवडा विद्यार्थ्यांना तितकासा अनुकूल नाही. असं असलं तरी ते एखाद्या संशीधनात सहभागी होऊ शकतील. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या सामान्य असल्यानं पैश्यांची देवाण-घेवाण करणे टाळावे. प्रेमीजनांना सावध राहावं लागेल. वैवाहिक जीवनात एखाद्या जुन्या गोष्टीमुळं कटुता वाढण्याची संभावना आहे. अशावेळी आपल्या बुद्धिचातुर्याने हि कटुता दूर करण्याचा प्रयत्न केल्यास नात्यात गोडवा निर्माण होऊ शकतो.
तूळ (Libra) : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य आहे. ह्या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहावं लागेल. आपणास खोकला, सर्दी, पोटदुखी इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्यापाऱ्यांना त्यांच्या जुन्या व्यापारात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती संभवते. विद्यार्थ्यांसाठी आठवडा काहीसा त्रासदायी आहे. ह्या आठवड्यात काही मित्रांपासून त्यांना दूर राहावं लागेल. ज्यांना घर, जमीन इत्यादींची खरेदी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आठवडा प्रतिकूल आहे. ह्या आठवड्यात कर्ज मिळविण्यात सुद्धा त्रास होऊ शकतो. आपल्या अहंकारामुळं प्रणयी जीवनात दुरावा वाढू शकतो. वैवाहिक जीवनात सुद्धा अहंकार आणि शंकेमुळं संबंधात कटुता येऊ शकते. थोडक्यात आपसातील तणाव आपल्या नात्यातील गोडवा कमी करण्याची शक्यता आहे.