महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

'वसंत पंचमी'दिनी पिवळ्या रंगाला आहे महत्त्व ; 2024 मध्ये कधी साजरी होणार 'वसंत पंचमी', जाणून घ्या सविस्तर - Vasant Panchami Significance

Vasant Panchami 2024 : माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी ही 'वसंत पंचमी' म्हणून साजरी केली जाते. यंदा हा सण 14 फेब्रुवारीला साजरा होणार आहे. वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा करणं शुभ मानलं जातं. हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Vasant Panchami 2024
वसंत पंचमी 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2024, 12:39 PM IST

Vasant Panchami 2024 : शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी म्हणजे 'वसंत पंचमी' होय. वसंत पंचमीलाच 'श्रीपंचमी' किंवा 'ज्ञानपंचमी' म्हणतात. वसंत ऋतूला ऋतूंचा राजा असं मानलं जातं. त्याचं स्वागत करण्याचा हा विशेष दिवस मानला जातो. मकर संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा होतो.

सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा : माघ महिन्यामध्ये गणेश जयंती पाठोपाठ येणारा हिंदू धर्मियांसाठी आणखी एक खास दिवस म्हणजे 'वसंत पंचमी' होय. वसंत पंचमीचा दिवस सरस्वती पूजा म्हणूनही ओळखला जातो. हिंदू धर्मात सरस्वती देवीला ज्ञान आणि कलेची देवी म्हटलंय. यावेळी १४ फेब्रुवारी रोजी 'वसंत पंचमी' साजरी होणार आहे. या दिवशी विद्येची देवी सरस्वतीची विशेष पूजा केली जाते. वाचन, लेखन आणि नृत्याच्या कृपेसाठी सरस्वतीचं स्मरण केलं जातं.

  • सरस्वती पूजनाची तारीख आणि वेळ: पंचमी तिथीची सुरुवात १३ फेब्रुवारी दुपारी ०२:४१ पासून होईल तर पंचमी तिथीची समाप्ती 14 फेब्रुवारी दुपारी 12:09 पर्यंत होईल.
  • पूजेची शुभ वेळ: 14 फेब्रुवारी सकाळी 6 वाजून 17 मिनिटे ते दुपारी 12 वाजून 01 मिनिटापर्यंत आहे.

पिवळ्या रंगाला आहे महत्त्व : वसंत पंचमीला सरस्वती मातेची पूजा केली जाते. या दिवशी पिवळे कपडे घालावेत. या दिवशी पिवळे कपडे घालणं खूप शुभ मानलं जातं. शास्त्रानुसार, पिवळा रंग खूप शुभ मानला जातो. हा रंग विशेषत: शुभ कार्यात वापरला जातो. पिवळा रंग ज्ञान आणि बुद्धीचे द्योतक आहे. पिवळा रंग आनंद, शांती, अभ्यास, एकाग्रता आणि मानसिक बौद्धिक प्रगतीचं प्रतीक आहे.

असे करा सरस्वती पूजन: 'वसंत पंचमी'ला सरस्वती पूजेला बिहारमध्ये खूप महत्त्व आहे. या दिवशी शाळांमध्येही माता सरस्वतीची पूजा केली जाते. माता सरस्वतीची उपासना करणाऱ्यांनी 'वसंत पंचमी'च्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर जागरण करावं. सकाळी स्नान झाल्यावर पिवळे वस्त्र परिधान करून माता सरस्वतीच्या पूजेची तयारी करावी. त्यानंतर पूजेच्या ठिकाणी कापड ठेवून त्यावर तांदूळ घालून अष्टदल बनवावे. याच्या समोर तुम्ही गणपतीची मूर्ती बसवू शकता. अष्टदलाच्या पाठीमागे जव आणि गव्हाच्या कर्णफुले (बसंत पुंज) सोबत पाण्याने भरलेला कलश बसवावा. वसंत पंचमीला सर्वप्रथम तेथे गणपतीची पूजा करण्याचा विधी आहे. म्हणूनच सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा करावी, वसंत पूजेपासून रती आणि कामदेवाची पूजा करावी. हवन केल्यानंतर केशर किंवा हळदीच्या मिश्रणाचा नैवेद्य दाखवावा. या दिवशी भगवान श्री हरी विष्णूची पूजा करण्याचीही विशेष पद्धत आहे. म्हणूनच भगवान विष्णूची आराधना करावी. या सर्व प्रक्रियेनंतर गणेशस्थानात सूर्य, विष्णू, रती, कामदेव आणि महादेवाची पूजा करावी. देवी सरस्वतीची पूजा करावी सर्वप्रथम अष्टदलावर माता सरस्वतीची मूर्ती स्थापित करावी. त्यानंतर पिवळ्या वस्त्राने हळद, चंदन, रोळी, पिवळी मिठाई अर्पण करावी. पिवळी फुले, अक्षत आणि केशर याशिवाय वाद्ये आणि पुस्तकांची देखील वसंत पंचमीच्या दिवशी पूजा करावी, यामुळं माता सरस्वती प्रसन्न होते.

हेही वाचा -

  1. Pandharpur Vitthal Temple Donation: पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी पावणे दोन कोटी रुपयांचे गुप्तदान
  2. Vasant Panchami 2023 : 2023 मध्ये कधी साजरी होणार वसंत पंचमी, जाणून घ्या
  3. Vasant Panchami : जाणून घ्या... वसंत पंचमीला सरस्वती पूजनाचे विशेष महत्व

ABOUT THE AUTHOR

...view details