मेष (ARIES) : आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दशमात असेल. आज आपण कुटुंबीयांसह घरगुती बाबींचा महत्वपूर्ण विचार-विनिमय कराल. घराचा कायापलट करण्याच्या नवीन योजना आखाल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसह महत्वपूर्ण मुद्दयांवर विचार-विमर्श कराल. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करावा लागेल. आई आणि स्त्री वर्गाकडून लाभ संभवतो. आपल्या एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारी मदत मिळेल. कामाचा व्याप वाढल्यानं अस्वस्थ राहाल.
वृषभ (TAURUS) :आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र भाग्यात असेल. आज विदेश गमनाच्या सुवर्णसंधी येतील. परदेशातील मित्राकडून बातम्या समजतील. व्यापार्यांना व्यापारात धनलाभ होईल. नवे बेत हाती घ्याल. दूरचे प्रवास होतील. एखाद्या विषयात प्रगती होईल. संततीची प्रगती होईल. आरोग्याकडं लक्ष द्यावं लागेल.
मिथुन (GEMINI) :आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज संतापाची भावना आपले नुकसान करेल. आजारी व्यक्तींची तपासणी किंवा शस्त्रक्रिया करावी लागेल. मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रकृती बिघडेल. मानसिकदृष्टया निराश व्हाल. मनाला शांतता मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
कर्क (CANCER): आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सातव्या स्थानी असेल. आज संवेदनशीलता आणि प्रेमाने व्याप्त होऊन आपलं मन भिन्नलिंगी व्यक्तीकडं आकर्षित होईल. मौल्यवान मौज-मजेच्या वस्तू, वस्त्राभूषणे तथा वाहन इत्यादींची खरेदी होईल. दांपत्य जीवन उत्तम राहील. व्यापार्यांना विदेशी व्यापारात चांगला फायदा होईल. भागीदारी फायदेशीर ठरेल. प्रणयाराधनात सफलता मिळेल.
सिंह (LEO) :आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सहाव्या स्थानी असेल. आज उदासीनता आणि साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल. दैनंदिन कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. खूप परिश्रम कराल पण त्यामानानं कमी फळ मिळेल. नोकरीत सांभाळून राहा. सहकारी फारसे सहकार्य करणार नाहीत. आईच्या घराकडून काळजी वाटणार्या बातम्या येतील. शत्रूला तोंड द्यावं लागेल. वरिष्ठांशी मतभेद संभवतात.
कन्या (VIRGO): आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र पाचव्या स्थानी असेल. आज आपणाला संतती समस्येमुळं चिंता राहील. अपचना सारख्या पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. बौद्धिक चर्चा आणि वाद-विवादात सहभागी होऊ नका. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. प्रणयाराधनेत यशस्वी व्हाल. शेअर-सट्टा यापासून सावध राहा.
तूळ (LIBRA): आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आज सावध राहावं लागेल. वैचारिक सुज्ञपणा मानसिक स्वास्थ्य देईल. स्त्री वर्गाची चिंता राहील. आज शक्यतो प्रवास स्थगित ठेवा. वेळेवर भोजन आणि पुरेशी झोप न मिळाल्यानं शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. कौटुंबिक मिळकती संबंधी सावधपणे काम करणं हितावह ठरेल.