महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

'या' राशींना धनप्राप्तीसाठी अनुकूल दिवस, आर्थिक अडथळेही होतील दूर; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, जाणून घेऊ 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.

Horoscope 2024
राशीभविष्य 2024 (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

  • मेष (ARIES) :आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आज आपणाला अतिशय संवेदनशीलता जाणवेल. आपल्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. घर, जमीन इत्यादींशी संबंधित व्यवहार शक्यतो आज करू नयेत. एखाद्या स्त्रीमुळं अडचणीत याल. एखाद्या अपघाताची शक्यता असल्यानं पाण्यापासून दूर राहा. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी आहे.
  • वृषभ (TAURUS) : आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या भावात असणार आहे. आज आपण अती संवेदनशीलतेमुळं आणि भावुक विचारांमुळं खूप हळवे व्हाल. आपली आणि इतरांविषयीची काळजी दूर झाल्यामुळं मनाला दिलासा मिळेल. कल्पनाशक्ति आणि सृजनशीलतेने काम कराल. कुटुंबीय आणि मित्रांसह स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. अचानकपणे प्रवास करावा लागेल. पैशाविषयी दक्ष राहून आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल.
  • मिथुन (GEMINI) : आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या भावात असणार आहे. आज नातलग आणि मित्रांशी संवाद साधल्यानं आपण आनंदित व्हाल. सुरूवातीस आर्थिक नियोजनात काही अडचणी येतील. पण नंतर सहजपणे ते काम पार पाडू शकाल. महत्वाच्या कामाची सुरुवात उशीरा होईल पण नंतर मात्र, सहजरित्या ती पार पडतील. त्यामुळं मनःशांती अनुभवू शकाल. नोकरी-व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. सहकार्यांचं अपेक्षित सहकार्य मिळू शकेल.
  • कर्क (CANCER) : आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज मित्राकडून भेट वस्तू मिळतील. त्यांच्यासह आपण आपला दिवस आनंदात घालवाल. प्रवास, मनपसंत भोजन आणि प्रिय व्यक्तीचा सहवास यामुळं प्रफुल्लित राहाल. पत्नीच्या सहवासात मन प्रसन्न राहील.
  • सिंह (LEO) : आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र बाराव्या भावात असणार आहे. आज कोर्ट-कचेरीच्या प्रश्नात सावध राहावं लागेल. आज मनात भावनांचा कल्लोळ उठेल. त्यामुळं हातून काही अवैध कृत्य घडण्याची शक्यता आहे. एखाद्या स्त्रीमुळं अडचणीत याल. उक्ती आणि कृती यात समतोल साधावा लागेल. विदेशातून एखादी आनंददायी बातमी येईल. कायदेशीर गोष्टींचा निर्णय विचार पूर्वक घ्यावा.
  • कन्या (VIRGO) : आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात असणार आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. मित्रांसह एखादा आनंददायी प्रवास होईल. दांपत्य जीवनात जादा जवळीक निर्माण होईल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. व्यापारातील पैसे मिळविण्यासाठी प्रवास करावा लागेल. अविवाहितांना जोडीदाराच्या शोध मोहीमेत यश मिळेल.
  • तूळ (LIBRA) : आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात असणार आहे. आज आपणाला नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांची आपल्यावर मर्जी राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. मनात भावनात्मकता वाढेल. आईच्या घराण्याकडून फायदा होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जमीन आणि मालमत्तेचे व्यवहार यशस्वीपणे करू शकाल. आजचा दिवस व्यवसायात यश प्राप्तीचा आहे.
  • वृश्चिक (SCORPIO) :आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात असणार आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. लेखन, साहित्य संबंधित काम कराल. व्यवसायातील वातावरण आपणास प्रतिकूल असेल. वरिष्ठ आपल्यावर नाराज होतील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. संततीशी मतभेद होतील. प्रवासाची शक्यता आहे. पैसा खर्च होईल.
  • धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात असणार आहे. आज आपणास खाण्या - पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कामात यश मिळण्यास विलंब झाल्याने नैराश्य येईल. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. कामाचा व्याप वाढेल. शक्यतो आज नवे काम हाती घेऊ नये. प्रकृती भिघडण्याची शक्यता आहे. आपल्या बोलण्यावर संयम ठेवाव लागेल. खर्चात वाढ होईल.
  • मकर (CAPRICORN) :आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातव्या भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यवसाय क्षेत्रात व्यापार वाढीस लागेल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादीमध्ये वाढ होईल. त्यामुळं आर्थिक स्तर मजबूत होईल. मान, प्रतिष्ठा वाढेल. एखादा प्रवास संभवतो.
  • कुंभ (AQUARIUS) :आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहाव्या भावात असणार आहे. आपणास कार्यात यश मिळाल्यानं प्रसिद्धी मिळेल. स्वभावात जास्त हळुवारपणा राहील. स्त्रीयांना माहेरहून अनेक चांगल्या बातम्या मिळतील. घरात उत्साहाचं वातावरण राहील. नोकरीत सुद्धा सहकारी उत्तम सहकार्य करतील. शरीर आणि मन प्रसन्न राहील. कौटुंबिक वातावरण सुख - शांतीचे राहील.
  • मीन (PISCES) : आज चंद्र कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या भावात असणार आहे. आज आपली सृजनशक्ती अधिकच वाढेल. कल्पनाशक्तीमुळं आज आपण साहित्य विश्वाची सफर कराल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. स्वभाव विशेष भावनाशील होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details