मेष (ARIES) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातव्या स्थानी आहे. आजचा दिवस आगळा-वेगळा अनुभव देणारा ठरेल. गूढ आणि रहस्यमय विद्येची गोडी वाटेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस नवीन कामाचा आरंभ करण्यास अनुकूल नाही. प्रवासात अचानक संकटे येतील. राग आणि वाणी ह्यावर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.
वृषभ (TAURUS) :आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहाव्या स्थानी आहे. आज दांपत्य जीवनात विशेष आनंद मिळेल. आपण सहकुटुंब एखाद्या सामाजिक ठिकाणी फिरायला किंवा छोटा प्रवास करायला जाऊन दिवस आनंदात घालवाल. स्नेह्यांसह उत्तम भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. विदेशातील मित्रांकडून आनंददायी बातम्या मिळतील. अचानक धनलाभ होईल. व्यापार्यांना व्यापारात वृद्धी होईल. सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत यश, प्रतिष्ठा मिळेल.
मिथुन (GEMINI) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात शांती आणि आनंदाचं वातावरण राहील. अपूर्ण कामे तडीस गेल्याने आपणांस यश आणि कीर्ती लाभेल. आर्थिक लाभ होतील. खर्चाचे प्रमाण मात्र वाढेल. पण केलेला खर्च वाया जाणार नाही. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. स्वभावात रागाचे प्रमाण मात्र वाढेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल.
कर्क (CANCER) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या स्थानी आहे. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. नवीन कार्यारंभासाठी आजचा दिवस प्रतिकूल आहे. मानसिक अशांतता आणि उद्वेगाने मन भरून जाईल. खिन्नता जाणवेल. पोटदुखी, अपचन, अजीर्ण इ. व्याधींमुळं हैराण व्हाल. अचानक पैसा खर्च करावा लागेल. प्रिय व्यक्तीकडून मन दुखावले जाईल किंवा अबोला धरला जाईल. एकादी मानहानी संभवते. शक्यतो प्रवास टाळावा.
सिंह (LEO) :आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या स्थानी आहे. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. कृतीवर संयम ठेवल्यास संभाव्य वाद टाळू शकाल. आईशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मनावर वैचारिक नकारात्मकतेचा पगडा राहील. संपत्तीच्या कागदपत्रावर सही करताना दक्षता घ्यावी. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
कन्या (VIRGO) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या स्थानी आहे. आजचा दिवस शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता यामुळं मनाला शांतता मिळवून देणारा आहे. कार्यात यश मिळेल. कुटुंबीय आणि मित्रपरिवार ह्यांच्याशी असलेल्या संबंधात गोडवा वाढेल. त्यांचं चांगलं सहकार्य मिळेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल.
तूळ (LIBRA) :आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज आपलं मनोबल कमी राहिल्यामुळं कोणत्याही निर्णयाप्रत येणं अवघड होईल. नवीन काम किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय आज टाळणं हितावह राहील. वाणीवर संयम ठेवल्यास कुटुंबियांशी होणारे संभाव्य वाद टाळू शकाल. हट्टीपणा सोडून सर्वमान्य मार्ग स्वीकारणे हितावह राहील.